Join us  

अश्विनी भावेने पहिल्यांदाच शेअर केला आईसोबतचा फोटो, पाहा त्यांच्या कुटुंबियांचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:11 PM

अश्विनी चित्रपटांमध्ये कमी काम करत असल्या तरी त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

ठळक मुद्देअश्विनीने नुकताच तिच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं. त्यांनी काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केला. अश्विनी भावे सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करतात. पण त्यातही त्या खूप चांगल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकतात. त्यांच्या ध्यानीमनी, मांजा या चित्रपटांना देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अश्विनी चित्रपटांमध्ये कमी काम करत असल्या तरी त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. इतकेच नाही तर सोशल मीडियाद्वारे त्या त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात.

अश्विनीने नुकताच तिच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर तुम्ही तुमच्या आईसारख्याच दिसता असे अश्विनी भावे यांचे चाहते त्यांना सांगत आहेत. 

अश्विनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांचे देखील फोटो आपल्याला अश्विनी यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.

अश्विनी भावे यांनी शाबास सुनबाई या मराठी चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज, वजीर, गोलात गोल, एक रात्र मंतरलेली, अशी ही बनवाबनवी अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी मराठीप्रमाणेच हिना, सैनिक यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

टॅग्स :अश्विनी भावे