Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आशुतोष गोवारीकर यांनी केले या व्यक्तिचे कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 07:15 IST

‘पानिपत’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या मंचावर येणार आहेत.

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. चला हवा येऊ द्या मध्ये मराठीच नाही तर बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.

येत्या आठवड्यात थुकरट वाडीत ‘पानिपत’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री कीर्ती सनन आणि संगीतकार अजय-अतुल हजेरी लावणार आहेत. चला हवा येऊ द्या च्या मंचावर हे कलाकार येणार म्हंटल्यावर थुकरट वाडीतील विनोदवीरांनी एकच कल्ला केला. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेश' या चित्रपटावर एक विनोदी स्किट त्यांनी सादर केलं. तसेच पानिपतचा 'विश्वास' या विषयावर सद्य परिस्थिती आणि चालू घडामोडींवर आधारित एक ज्वलंत पत्र पोस्टमन काका म्हणजे सागर कारंडे याने वाचलं. ते पत्र ऐकून आशुतोष गोवारीकर भारावून गेले. इतकंच नव्हे तर त्यांनी या पत्राला दाद देत अरविंद जगताप ज्यांनी हे पत्र लिहिलं त्यांचं देखील खूप कौतुक केलं. 

टॅग्स :चला हवा येऊ द्याझी मराठीआशुतोष गोवारिकर