Join us

'तू ही रे माझा मितवा'मध्ये पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आशुतोष गोखले, म्हणाला - खरंतर थोडं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 17:40 IST

Ashutosh Gokhale : 'रंग माझा वेगळा' मालिकेतून घराघरात पोहोचलेला कार्तिक इनामदार अर्थात अभिनेता आशुतोष गोखले लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

स्टार प्रवाहच्या 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेतून घराघरात पोहोचलेला कार्तिक इनामदार अर्थात अभिनेता आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तो 'तू ही रे माझा मितवा' (Tu Hi Re Maza Mitwa) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने आशुतोष पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. राकेश भोसले असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव असून अतिशय विक्षिप्त स्वभावाचे हे पात्र आहे. 

रंग माझा वेगळा मालिकेत आशुतोषने साकारलेल्या कार्तिक इनामदार या पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेत आदर्श पती आणि आदर्श मुलगा साकारल्यानंतर आशुतोषने नवा प्रयोग करण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठीच त्याने ही आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना आशुतोष म्हणाला, ‘याआधी बऱ्याचदा मला खलनायक साकारण्यासाठी विचारणा झालीय. तू ही रे माझा मितवा मालिकेतून मी पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. खरतर थोडं दडपण आहे. 

पुढे तो म्हणाला की, रंग माझा वेगळामध्ये सकारात्मक भूमिका मी साकारली मात्र मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात कार्तिक हे पात्र खलनायकी झालं होतं. त्यामुळे अभिनयाचे वेगवेगळे रंग प्रेक्षकांनी याआधीही अनुभवले आहेत. राकेश या पात्राला कसा प्रतिसाद मिळतोय याची प्रचंड उत्सुकता आहे.  

टॅग्स :आशुतोष गोखले