Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या साठीत आशिष विद्यार्थींनी बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, अशी आहे त्यांची रुपाली यांच्यासोबतची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 18:54 IST

Ashish Vidyarthi wedding: अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या साठीत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या साठीत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  आशिष त्याच्या व्लॉग्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात.  आशिष यांनी फॅशन उद्योजिका रुपाली बरुआसोबत विवाह केला आहे. कोर्ट मॅरेजनंतरचे फोटो या कपलने फॅन्ससोबत शेअर केले आहेत.

आशिष विद्यार्थी हे बॉलिवूडमधील दमदार अभिनेता आहेत. त्यांनी टीव्ही, चित्रपटांपासून वेब सीरिजपर्यंत उत्तम काम केले आहे. सध्या ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. रुपाली बरुआसोबत लग्न करून आशिष यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघे खूप आनंदी दिसत आहेत. दोघांनीही पारंपारिक भारतीय कपडे घातले आहेत. सोनेरी आणि पांढर्‍या रंगाच्या कपड्यांमध्ये हे कपल खूपच छान दिसत आहे.

अशी आहे त्यांची लव्हस्टोरी...

आशिष यांनी गुरुवारी कोलकाता येथे आसाममधील रुपाली बरुआसोबत कोर्ट मॅरेज केले. लग्नात त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नानंतर दोघे रिसेप्शन पार्टीही देणार आहेत. रुपाली बरुआ फॅशन इंडस्ट्रीशी निगडीत आहे आणि कोलकाता येथे फॅशन स्टोअर मालकीची आहेत. आशिष या लग्नाचे वर्णन एक असामान्य भावना म्हणून करताना दिसले. ते म्हणाला, "आमची प्रेमकथा ही एक लांबलचक कथा आहे जी कधीच सांगता येणार नाही. आम्ही काही काळापूर्वी भेटलो होतो आणि आमच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. आम्हा दोघांनाही आमचं लग्न अगदी साधेपणाने करायचं होतं. आम्ही नक्कीच गेट-टुगेदर पार्टी करू. ."

आशिष विद्यार्थींना आहे २३ वर्षांचा मुलगा

आशिष विद्यार्थी यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांची पहिली पत्नी राजोशी विद्यार्थी होती जिच्यापासून त्यांचा घटस्फोट झाला. याशिवाय आशिष यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगाही आहे. त्यांच्या मुलाचे नाव अर्थ विद्यार्थी असून तो २३ वर्षांचा आहे.

टॅग्स :आशिष विद्यार्थी