Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशा आत्या...! 'ही' अभिनेत्री होती आशा भोसलेंची भाची; तिच्याच सिनेमात केलेलं पहिल्यांदा काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:11 IST

आशा आत्याच्या आठवणीत अभिनेत्री भावुक

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर सिनेसृष्टी हळहळली आहे. प्रत्येकाच्या मनात आज आशाताईंचा स्वर घुमत आहे. आशा भोसले यांच्या कुटुंबियांच्या आयुष्यात तर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आशा भोसले या अष्टपैलू गायिका होत्या. रोमँटिक असो, भावुक असो किंवा अगदी पॉप कल्चर असो त्यांनी वेगवेगळ्या छटांची गाणी गायली. इतकंच नाही तर त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी पहिल्यांदा अभिनय केला. 'माई' या पद्मिनी कोल्हापुरेच्या सिनेमात त्यांनी भूमिका साकारली. त्यांच्या आठवणीत पद्मिनीने पोस्ट केली आहे.

पद्मिनी कोल्हापुरेने 'माई' सिनेमातील आशा भोसलेंसोबतचा सीन शेअर करत लिहिले, "माई सिनेमात माझ्या आईची- माईची संवेदनशील भूमिका तू साकारलीस. तू अभिनय केलेला हा एकमेव सिनेमा आहे हा तुझा आशीर्वाद मी कायम स्मरणात ठेवेन. यापेक्षा जास्त काय हवं? तुझ्यासोबत माझं सुंदर, सखोल नातं होतं..आशा आत्या."

मंगेशकर आणि कोल्हापुरेंचं होतं नातं

खूप कमी जणांना माहित आहे की पद्मिनी कोल्हापुरे या आशा भोसले यांच्या भाची आहेत. पद्मिनी आणि शिवांगी कोल्हापुरे या दोन बहिणींचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे आणि लता मंगेशकर चुलत भावंडं होते. त्यामुळे लता मंगेशकर, आशा भोसले या पद्मिनी कोल्हापुरेंच्या आत्या होत्या. बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्हिलन शक्ती कपूर यांनी पद्मिनीची बहीण शिवांगी कोल्हापुरेशी लग्न केलं.  यामुळे त्यांची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरचंही मंगेशकर कुटुंबाशी नातं जुळलं. श्रद्धाने अनेकदा लता मंगेशकर यांच्यासोबत 'आजी' असं कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत,.

English
हिंदी सारांश
Web Title : Asha Bhosle's niece Padmini Kolhapure's debut in her aunt's film.

Web Summary : Padmini Kolhapure, Asha Bhosle's niece, acted in 'Mai,' Bhosle's only film. Kolhapure cherished their bond, sharing memories of Bhosle, who played her mother in the movie. Their family connection links them through the Mangheshkar lineage.
टॅग्स :पद्मिनी कोल्हापुरेआशा भोसलेबॉलिवूड