Join us

आशा भोसलेंनी नातीसोबत या समाजकार्यासाठी घेतला पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 16:06 IST

सध्या जोरदार सुरु असणाऱ्या पर्यावर संरक्षणाच्या चळवळीचा एक भाग म्हणून आशा भोसले व झनाई भोसले या आजी-नातीच्या जोडीने #PlantATree ही नवीन चळवळ सुरु केलेली आहे

ज्येष्ठ गायिका आशा भोसले व त्यांची नातं झनाई भोसले यांच्या हस्ते एका फोनचे लाँचिंग करण्यात आला आहे. यावेळी बॅण्ड ऑफ बॉईज या लोकप्रिय बँडचे करण ओबेरॉय, चिंटू भोसले, शेरिन वर्गीस आणि डॅनी फर्नांडिस तसेच अनुजा भोसले आणि आनंद भोसले देखील उपस्थितीत होते.

आपली नातं घेत असलेला पुढाकार पाहून आशा भोसलेंचा आनंद द्विगुणित झाला होता. अशावेळी त्या सांगतात की, " मला आणि माझ्या परिवाराला झनाईचा अभिमान वाटतो." बॅण्ड ऑफ बॉईज बद्दल सांगताना त्या म्हणतात की, "ते खरोखर चांगले गातात. मी त्यांना २००१ मध्ये त्यांच्या पहिल्या शोमध्ये मी त्यांना नाचत नाचत गाताना पाहिले होते आणि आज देखील ते पूर्वीप्रमाणेच नाचले व तितकेच सुंदर गायले."

झनाई भोसले सांगते की, "मी स्वतःला खूप नशीबवान समजते की, मी भोसले कुटूंबाचा एक भाग आहे. परंतु ज्यावेळी मी खडतर आयुष्य असणाऱ्या मुलींकडे पाहते त्यावेळी मला आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावे असे सतत वाटत असते. म्हणूनच मी 'आयअज्युर' ही नवीन कल्पना अस्तित्वात आणली. माझ्या 'आयअज्युर' या अॅपल अधिकृत दुकानातील विक्रेतीचा एक भाग 'नन्ही कली' या लहान मुलींसाठी काम करणाऱ्या एनजीओ ला जाणार आहे."

सध्या जोरदार सुरु असणाऱ्या पर्यावर संरक्षणाच्या चळवळीचा एक भाग म्हणून आशा भोसले व झनाई भोसले या आजी-नातीच्या जोडीने #PlantATree ही नवीन चळवळ सुरु केलेली आहे. संगीताच्या वारश्या बरोबरचं समाजप्रतीच्या आपल्या कर्तव्याचे संस्कार देखील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जात असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आशा भोसले व झनाई भोसले ही आजी-नातीची आहे यात काही शंकाचं नाही.

टॅग्स :आशा भोसले