Join us

शाहरूख खानची होणारी सून पाहिली का? ८ वर्षांनी मोठी आहे आर्यन खानची गर्लफ्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 11:15 IST

अशातच शाहरूख खानच्या होणाऱ्या सूनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा ड्रग्ज प्रकरणात अडकला होता, तेव्हापासून कॅमेरापासून दूर असतो. आपलं खाजगी आयुष्य पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होणार नाही याची काळजी तो घेत असतो. पण, त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे पापाराझी शोधून काढतातच. गेल्या जानेवारी महिन्यात न्यू इयर पार्टीमध्ये आर्यन खानला ८ वर्षांनी मोठ्या असलेल्या परदेशी अभिनेत्री आणि मॉडेलसोबत स्पॉट केलं होतं. तेव्हापासून दोघांच्या रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. आता अशातच शाहरूख खानच्या होणाऱ्या सूनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

आर्यन खानच्या रुमर्ड गर्लफ्रेंडच नाव लारिसा बोन्सी (Larissa Bones) आहे. नुकतंच लारिसा नेटकऱ्यांच्या नजरेत आलीय. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. स्टायलिश ड्रेसमध्ये ती स्पॉट झाली.  ती खूपच सुंदर दिसत होती.  या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की, लारिसानं ब्राउन रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिनं जॅकेटही कॅरी केलं होतं. पापाराझींनी गाठताच तिनं फोटोसाठी काही पोझ दिल्याचंही दिसलं. या व्हिडीओवर लोक खूप कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत.

लारिसाने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांच्यासोबत २०११ मध्ये आलेल्या 'देसी बॉईज' या चित्रपटातील 'सुबह होने ना दे' या गाण्यात ती दिसून आली होती. लारिसाने 'थिक्का' या तेलुगू चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयप्रवासाची सुरुवात केली आहे. त्यानंतर २०१८ मध्ये आलेल्या 'Next Enti' या चित्रपटातही ती दिसून आली होती. वरुण धवनसोबतही अभिनेत्रीने काम केलं आहे. तर आर्यन खान सध्या त्याच्या पहिल्या 'स्टारडम' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. आर्यनच्या या वेबसीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

टॅग्स :आर्यन खानशाहरुख खानबॉलिवूड