Join us

Aryan Khan Gets Bail: केवळ तीन शब्दांत सुहाना व्यक्त; भावासाठी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 16:40 IST

Aryan Khan Gets Bail:आर्यनला जामीन मिळाल्यानंतर त्याची बहीण सुहाना खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर तिचा आनंद व्यक्त केला आहे.

Aryan Khan Gets Bail: ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या (NCB) कोठडीत असलेल्या आर्यन खानला (Aryan Khan) अखेर गुरुवारी (२८ ऑक्टोबर) जामीन मिळाला. त्याच्यासोबत ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे सध्या खान कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यामध्येच आर्यनला जामीन मिळाल्यानंतर त्याची बहीण सुहाना खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर तिचा आनंद व्यक्त केला आहे. सोबतच आर्यनसाठी खास शब्ददेखील लिहिले आहेत.

सुहानाने इन्स्टाग्रामवर एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत आर्यन खान आणि शाहरुख खान दोघंही दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Aryan Khan Gets Bail: जामीन मिळाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया; तुरुंगातील कर्मचाऱ्यांना म्हणाला...

आर्यनला जामीन मिळताच सुहानाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये केवळ i love you असं म्हणत भावाप्रतीचं प्रेम व्यक्त केलं आहे. शाहरुखचं कुटुंब या कठीण प्रसंगाला सामोरं जात असताना सुहाना काही वैद्यकीय कारणामुळे भारतात येऊ शकली नाही. मात्र, ती सातत्याने कुटुंबाच्या संपर्कात होती. तसंच सोशल मीडियावरदेखील ती व्यक्त होत होती.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सविस्तर आदेश दिल्यामुळे आर्यन खानची मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार आहे.  2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने एका क्रुझवर छापा टाकला होता. यावेळी अनेक बड्या उद्योजकांच्या मुलांसह आर्यनदेखील या ड्रग्ज पार्टीमध्ये सहभागी होता. 

टॅग्स :मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीसुहाना खानआर्यन खानशाहरुख खानअमली पदार्थनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो