एकेकाळी शाहरूख खान आणि हृतिक रोशनसोबत पंगा घेणारा अभिनेता अर्जुन रामपाल याचे फिल्मी करिअर जवळ जवळ संपल्यात जमा आहे. होय, शाहरूख खानचा ‘रा-वन’ हा अर्जुनचा शेवटचा मोठा प्रोजेक्ट होता. या चित्रपटादरम्यान अर्जुन व शाहरुख यांच्यात वाजले होते. या वादाचा शाहरुखवर कुठलाच परिणाम झाला नाही. पण अर्जुनच्या करिअरची नौका मात्र डगमगू लागली. या वादानंतर अर्जुनला मोठे प्रोजेक्ट मिळणे बंद झाले आणि तो केवळ लहान-सहान चित्रपटांपुरताच उरला.
अर्जुन रामपालला मिळेना काम! आता ‘फायनल कॉल’च वाचवू शकते करिअर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 06:00 IST
एकेकाळी शाहरूख खान आणि हृतिक रोशनसोबत पंगा घेणारा अभिनेता अर्जुन रामपाल याचे फिल्मी करिअर जवळ जवळ संपल्यात जमा आहे.
अर्जुन रामपालला मिळेना काम! आता ‘फायनल कॉल’च वाचवू शकते करिअर!!
ठळक मुद्देतूर्तास अर्जुन त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. गर्लफ्रेन्ड गॅबरिलासोबत अर्जुन अगदी बिनधास्त मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसतो.