Arjun Rampal: अर्जुन रामपालने एक लोकप्रिय अभिनेता आहे. प्रचंड संघर्ष करून त्याने यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. अर्जुनने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले असून बॉलिवूडच्या यशस्वी बड्या कलाकारांबरोबर त्याने स्क्रीन देखील शेअर केली आहे. आता लवकर तो 'राणा नायडू २' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यानं खलनायकाची भूमिका साकारली आहे. नेटफ्लिक्सने मुंबईत २०२५ वर्षातील चित्रपट आणि सीरीजच्या ट्रेलर लाँचसाठी स्पेशल कार्यक्रम ठेवला होता. यामध्ये अर्जून रामपालला दुखापत झाल्याची माहिती आहे.
नेटफ्लिक्सकडून 'राणा नायडू २'ची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमात अर्जून रामपालनं काचेची चौकट तोडून स्टेजवर भव्य एन्ट्री केली. पण, काच फोडताना अर्जून रामपालला दुखापत झाली आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये अर्जुन रामपालच्या बोटातून रक्त वाहत असल्याचं दिसून येतं आहे.
पण, या अपघातानंतरही अर्जुन रामपालच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं. यावेळी अर्जुनने काळा कुर्ता आणि पायजमा घातला होता. दरम्यान, 'राणा नायडू २' या वर्षी २०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सध्या मालिकेची रिलीज तारीख जाहिर करण्यात आलेली नाही. या चित्रपटाची निर्मिती सुंदर आरोन यांनी केली आहे. यात सुचित्रा पिल्लई, अभिषेक बॅनर्जी, गौरव चोप्रा, सुरवीन चावला, इशिता अरुण आणि कृती खरबंदा या सगळ्यांचा भूमिका पाहायला मिळणार आहे.