Join us

OMG!! अर्जुन कपूरच्या हातात मंगळसूत्र; मलायकासोबत लग्नाची तयारी की आणखी काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 15:12 IST

अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) आज इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि चर्चेला उधाण आले.

ठळक मुद्देअर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर गेल्या महिन्यातच त्याचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा लीड रोलमध्ये होती.

अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) आज इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि चर्चेला उधाण आले. होय, अर्जुनच्या हातात मंगळसूत्र पाहून ही लग्नाची तयारी की नव्या सिनेमाची? असा प्रश्न चाहत्यांना पडला.अर्जुनने त्याच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर एक फोटो शेअर केला. यात तो हातात मंगळसूत्र पकडून आहे. या पोस्टमध्ये अर्जुनने बेबो अर्थात करिना कपूरला (Kareena Kapoor) प्रश्न विचारला. पण काही लोकांनी यातही मलायका अरोराला (Malaika Arora) शोधले.

‘ की अ‍ॅण्ड का चित्रपटाच्या वेळची एक आठवण... सेटला आणि माझ्या ऑनस्क्रिन ‘की’ला मिस करत आहे. हा चित्रपट माझ्या जवळचा आहे कारण तो मी माझ्या आईसाठी केला होता. करीना आणि बल्की सरांसोबत काम केल्यामुळे तर तो अधिकच जवळचा आहे. मला वाटतेय आपण याचा सिक्वेल करावा. काय म्हणतेस करीना? ,’ असे हा फोटो शेअर करताना अर्जुनने लिहिले.अर्जुनने खरे तर ‘की अ‍ॅण्ड का’ या सिनेमाला 5 वर्षे पूर्ण (5YearsOfKiandKa) झाल्यानिमित्त ही पोस्ट टाकली. पण युजर्सनी या पोस्टचा संबंध मलायकाशी  जोडला. हे मंगळसूत्र मलायकासाठी तर नाही ना? असा सवाल एका युजरने त्याला केला. अन्य एका युजरने, ‘की अ‍ॅण्ड का’च्या सीक्वलमध्ये करिना नको, मलायका हवी, असे लिहिले. हे मंगळसूत्र मलायकाच्या गळ्यात बांध आणि संपव, अशी कमेंट एका युजरने केली.

तुम्हाला ठाऊक आहेच की, मलायका व अर्जुन कपूर दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता हे नातं कुणापासूनही लपून राहिलेले नाही. सध्या अर्जुन मलायकासोबतच अलिबागमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय. त्यांच्यासोबत रिया कपूर, मसाबा गुप्ताही व्हॅकेशनवर गेल्या आहेत.अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर गेल्या महिन्यातच त्याचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा लीड रोलमध्ये होती.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोराकरिना कपूर