Join us

मलायकासोबतच्या रिलेशनशीपबाबत अर्जुनचा नवा खुलासा म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 16:32 IST

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बिनधास्तपणे आपल्या प्रेमाची जाहिर कबुली सोशल मीडियावर देत असतात.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बिनधास्तपणे आपल्या प्रेमाची जाहिर कबुली सोशल मीडियावर देत असतात.  अर्जुन-मलायका बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित कपलपैकी एक आहे.अर्जुन-मलायका यापूर्वीही अनेकदा ट्रोल झाले आहेत. दोघांच्या वयात बरेच अंतर आहे. एवढेच नाही तर मलायका घटस्फोटित आणि एका तरूण मुलाची आई आहे. ट्रोलर्स अनेकदा मलायका व अर्जुनच्या नात्याची टर उडवतात. अर्थात काही या नात्याची प्रशंसा करणारेही आहेत.

जनसत्ताच्या रिपोर्टनुसार मलायाकासोबतच्या लग्नाबाबत अर्जुन कपूर म्हणाला, ''लग्नाबाबत अजून कोणाता निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र लग्नासंबंधी जेव्हा आम्ही निर्णय घेऊ तेव्हा नक्कीच सांगू. लग्नाला आम्ही सगळ्यांना बोलवणार. मात्र आम्ही आता लग्न करत नाही आहोत. पुढे तो म्हणाला, तुम्हाला वाटत का माझे कुटुंबीय मला गुपचूप लग्न करण्याची परवानगी देतील का?''    

नुकतेच मलायका-अर्जुन आॅस्ट्रियाच्या ट्रिपवर गेले होते. येथील अनेक रोमॅन्टिक फोटो दोघांनी शेअर केले होते. त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना भावते आहे. त्याआधी दोघे मालदीव व्हॅकेशनवर गेले होते.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अर्जुन कपूर सध्या पानीपतच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमासाठी अर्जुनने बाल्डदेखील केलं होतं. त्यामुळे त्याला गेल्या ९ महिन्यांपासून कॅप घालून फिरावं लागलं होतं. या चित्रपटात अर्जुन एक वॉरियरच्या रुपात पहायला मिळणार आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा