Join us

अरबाजची कथित गर्लफ्रेन्ड यलोचे हॉट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 15:42 IST

यलो मेहरा सध्या सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यलोचे काही बिकीनी फोटोज सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानची कथित गर्लफ्रेन्ड यलो मेहरा सध्या सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यलोचे काही बिकीनी फोटोज सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत. 

अरबाज खान याने मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर सध्या तो यलोला डेट करत असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. पण त्याने अनेकदा ती केवळ एक चांगली मैत्रिण असल्याचेच स्पष्ट केले आहे. पण दोघे बराच वेळ एकत्र घालवत असल्याने त्यांच्यात काहीतरी सुरु असल्याची चर्चा आहे. 

यलो अरोरा ही एक मॉडेल, शेफ, हॉटेल मालक आणि इंटेरिअर डिझायनर आहे. अरबाजने तिच्यासोबतचे आणि तिने अरबाजसोबतचे काही फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये अफेअर सुरु असल्याची जोरदार चर्चा आहे. पण अरबाजने नेहमीच याला नकार दिला आहे.

टॅग्स :बॉलिवूडअरबाज खान