अभिनेता अरबाज खान क्यूप्ले (Quplay) या युट्युबवरील चॅनेलवर सुरू होणाऱ्या 'क्विक हिल पंच' या चॅट शोचे सूत्रसंचालन करणार आहे. या शोमध्ये अरबाज बॉलिवूडमधील सेलिब्रेटींसोबत बातचीत करणार आहे.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}अरबाज खानच्या 'क्विक हिल पंच' या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये दहा एपिसोड्स असणार आहे आणि प्रत्येक एपिसोड वीस मिनिटांचा असणार आहे. हा एपिसोड आठवड्यातून एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये करण जोहर, करीना कपूर खान, कपिल शर्मा, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, नवाजुद्दीन सिद्दीकी व सनी लियोनसारखे सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत. या शोचा पहिला एपिसोड १२ मार्चला दुपारी १ वाजता लाइव्ह होणार आहे. या शोचे लिखाण व दिग्दर्शन अबी ऑबेरॉयने केले आहे.
क्यूप्लेचे संस्थापक सुमीत दत्त म्हणाले की, ''क्विक हिल पंच' हा दुसरा शो लाँच करताना आम्ही खूप उत्सुक आहेत. या शोचे सूत्रसंचालन अरबाज खान करणार आहे. हा खूप मजेशीर शो असणार आहे. यापूर्वी न पाहिलेला असा अंदाज अरबाज खानचा या शोमध्ये पाहायला मिळणार आहे.'
तर अरबाजने सांगितले की, 'डिजिटल मीडियाचा हा नवा अनुभव माझ्यासाठी असणार आहे. अशाप्रकारचे काम यापूर्वी मी कधी केलेले नाही. मात्र या शोसाठी मी खूप उत्सुक आहे. डिजिटल माध्यमात पदार्पण करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या करियरच्या सुरूवातील चित्रपटातल्या अभिनयानंतर निर्माता बनलो आणि आता सूत्रसंचालक. मला आशा आहे की हा शो लोकांना नक्कीच आवडेल.'