Join us

"जरा समजून घ्या यार", प्रेग्नंट पत्नीसोबत दिसला अरबाज खान; पापाराझींना केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:04 IST

प्रेग्नंट पत्नीची काळजी घेताना दिसला अरबाज खान, पापाराझींना म्हणाला...

दिग्दर्शक, अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अरबाजची दुसरी पत्नी शूरा खान (Sshura Khan) प्रेग्नंट आहे. अरबाज आणि शूराचा नुकताच व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अरबाज तिची काळजी घेताना दिसतोय. यामध्ये शूराचा बेबी बंपही स्पष्ट दिसतोय. दोघांनीही ही गुडन्यूज अजून जाहीर केलेली नाही मात्र लपवलेलीही नाही. त्यामुळे अरबाज वयाच्या ५७ व्या वर्षी बाबा होणार ही बातमी कन्फर्म आहे. 

अरबाज आणि शूरा बॉलिवूडमधील क्युट कपल आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी अरबाजने दुसरं लग्न केलं. त्यामुळे त्याची खूप चर्चा झाली होती. आता तर तो पुन्हा बाबाही होणार असल्याने खान कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. नुकतंच अरबाज आणि शूराला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. यावेळी शूरा शॉर्ट फ्लोरल वनपीसमध्ये होती. तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. ती थोडी लाजतही होती. कॅमेऱ्यासमोर दोघांनी पोज दिली. नंतर अरबाजने तिला गाडीत बसवलं. पापाराझींपैकी एक जण म्हणाला, 'जाऊद्या त्यांना'. तेव्हा अरबाज पापाराझींकडे बघून तो म्हणाला, 'सगळं झाल्यावर आता म्हणे जाऊद्या. कधीकधी तुम्हीही जरा समजून घ्या यार'. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

२०१७ साली अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट झाला होता. त्यांना २२ वर्षांचा अरहान हा मुलगाही आहे. यानंतर अरबाजला ६ वर्षांनी पुन्हा प्रेम मिळालं. शूरा ही रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट होती. तेव्हाच अरबाज आणि  शूराची ओळख झाली होती. दोघांनी मित्रपरिवाराच्या उपस्थित रजिस्टर मॅरेज केलं होतं. तेव्हा अरबाज ५५ वर्षांचा होता. या वयात पुन्हा लग्न केल्याने तो ट्रोलही झाला होता. शूरा खानचंही हे दुसरं लग्न आहे. पहिल्या पतीपासून तिला आधीच एक मुलगी आहे. आता लवकरच खान कुटुंबात आणखी एक छोटा पाहुणा येणार आहे. अद्याप अरबाज किंवा शूराने यावर भाष्य केलेलं नाही. मात्र शूराच्या व्हिडिओंमधून तिच्या बेबी बंपवरुन आता ही गुडन्यूज समोर आली आहे.

टॅग्स :अरबाज खानप्रेग्नंसीव्हायरल व्हिडिओबॉलिवूड