Join us

‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’च्या भारतीय चाहत्यांना मिळणार खास सरप्राईज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 15:26 IST

एका कथेचा क्लायमॅक्स अर्थात शेवट जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना १० वर्षांत एकापाठोपाठ २१ चित्रपटाची शृंखला पाहावी लागत असेल तर ही कथा किती अद्भूत असेल, याची कल्पना आपण करू शकतो. आम्ही कुठल्या कथेबद्दल बोलतोय, याचा अंदाज तुम्ही बांधला असेलच.  आम्ही बोलतोय, ते अ‍ॅव्हेंजर्स या हॉलिवूड शृंखलेबद्दल.

ठळक मुद्देअ‍ॅवेंजर्स -एंडगेम’ येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होतो आहे. याआधीच्या भागात थानोसने पृथ्वीवरची अर्धी लोकसंख्या आणि सर्व सुपरहिरोंना मारल्याचे दाखवण्यात आले होते. ‘अ‍ॅवेंजर्स -एंडगेम’मध्ये यानंतर काय होते, हे दाखवले जाणार आहेत.  

एका कथेचा क्लायमॅक्स अर्थात शेवट जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना १० वर्षांत एकापाठोपाठ २१ चित्रपटाची शृंखला पाहावी लागत असेल तर ही कथा किती अद्भूत असेल, याची कल्पना आपण करू शकतो. आम्ही कुठल्या कथेबद्दल बोलतोय, याचा अंदाज तुम्ही बांधला असेलच.  आम्ही बोलतोय, ते अ‍ॅव्हेंजर्स या हॉलिवूड शृंखलेबद्दल.अ‍ॅव्हेंजर्स सीरिजचा अखेरचा चित्रपट ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’ लवकरच प्रदर्शित होतोय. हा चित्रपट बनवणा-या मार्वेल स्टुडिओने सध्या जगभर प्रमोशनचा धडाका चालवला आहे. भारतातही याचे जबरदस्त प्रमोशन होणार आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’चे दिग्दर्शक जो रूसो स्वत: या मुंबईत येत या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. तूर्तास या बहुप्रतिक्षीत सुपरहिरो मुव्हीबद्दलची ताजी बातमी म्हणजे, मार्वेल स्टुडिओने भारतीय प्रेक्षकांना एक मोठे सरप्राईज देण्याची तयारी चालवली आहे.

तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’ हिंदीसह तामिळ आणि तेलगू अशा दाक्षिणात्य भाषांतही प्रदर्शित होतोय. ‘गजनी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ए आर मुरूगदास ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’च्या साऊथ व्हर्जनचे संवाद लिहित आहेत. याशिवाय मार्वेल स्टुडिओने ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’चे भारतीय अँथम रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे अँथम साँग बनवण्याची जबाबदारी सुप्रसिद्ध भारतीय संगीतकार व गायक ए आर रहेमान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. रहेमान हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत हे अँथम साँग बनवणार आहेत.साहजिकच ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’सीरिजमध्ये सहभाग असल्याबद्दल रहेमान प्रचंड उत्साहित आहेत. माझ्या स्वत:च्या कुटुंबात मार्वेलचे अनेक चाहते आहेत. आता ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’च्या कथेत फिट बसेल आणि भारतीय प्रेक्षकांना आवडेल, असे काही करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. या कसोटीवर खरे उतरण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असे रहेमान यांनी सांगितले.

अ‍ॅवेंजर्स -एंडगेम’ येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होतो आहे. याआधीच्या भागात थानोसने पृथ्वीवरची अर्धी लोकसंख्या आणि सर्व सुपरहिरोंना मारल्याचे दाखवण्यात आले होते. ‘अ‍ॅवेंजर्स -एंडगेम’मध्ये यानंतर काय होते, हे दाखवले जाणार आहेत.  

टॅग्स :अ‍ॅवेंजर्स- एंडगेमए. आर. रहमान