Join us
Daily Top 2Weekly Top 5

ए.आर.रहमान आणि गुलजार 'मेरी पुकार सुनो'साठी आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 18:55 IST

'मेरी पुकार सुनो' गाण्याचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

संगीत क्षेत्रातील दोन दिग्गज व्यक्ती भारतीय प्रसिद्ध गीतकार गुलजार आणि संगीतकार ए.आर. रहमान मेरी पुकार सुनो या गाण्यासाठी एकत्र आले आहेत. सोनी म्युझिक इंडियाने या गाण्याची निर्मिती केली आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर टीझर शेअर केला आहे. या गाण्याला अलका याज्ञिक, श्रेया घोषाल, के एस चित्रा, साधना सरगम, साशा तिरुपती, अरमान मलिक आणि असीस कौर हे सात प्रख्यात गायक स्वरसाज देणार आहेत. 

संगीत क्षेत्रातील ए.आर. रहमान आणि गुलजार यांच्यासारखे दोन दिग्गज व्यक्ती एकत्र आल्यामुळे मेरी पुकार सुनो हे गाणे श्रोत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.मेरी पुकार सुनो हे गाणे सध्याच्या काळात सकारात्मक उर्जा प्रदान करणार आहे. जागतिक संगीत दिनादिवशी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतेच सोनी म्युझिक इंडियाने या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. या गाण्याचे बोल गुलजार यांच्या लेखणीतून साकार झाले आहेत तर ए. आर. रहमान यांनी हे गाणे कंपोझ केले आहे. या गाण्याच्या निमित्ताने भारतातील प्रसिद्ध गायक अलका याज्ञिक, श्रेया घोषाल, के.एस. चित्रा, साधना सरगम, साशा तिरुपती, अरमान मलिक आणि अनीस कौर हे एकत्र आले आहे. या गाण्यातून इक जहाँ- इक उम्मीद असा संदेश देण्यात येणार आहे. 

टॅग्स :ए. आर. रहमानगुलजार