ऑस्करविजेते व नुकत्याच झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आलेले गायक ए आर रहमान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रहमान यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
रहमान यांना चेन्नईतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांनी काही बोलण्यास नकार दिला आहे.
ए आर रहमान यांच्या छातीत दुखू लागले होते. यामुळे त्यांना हार्ट अटॅकच्या शक्यतेने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांची अँजिओग्राफी केली जाऊ शकते, असे सुत्रांनी सांगितले आहे.
ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो लग्नाच्या २९ वर्षांनी घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. ए आर रहमानने ट्वीट करत घटस्फोट घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आम्हाला वाटलं होतं की आम्ही ३० वर्ष पूर्ण करू. पण, प्रत्येक गोष्टीला अंत असतो, असे रहमानने म्हटले होते. १९९५ मध्ये ए आर रहमान आणि सायरा बानो यांनी लग्न केलं होतं. त्यांना खतीजा, रहीमा या दोन मुली आणि अमीन हा मुलगा आहे. घटस्फोट घेण्याबाबत सायरा बानो यांनी याआधी सांगितलं होतं. बराच विचार केल्यानंतरच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.