Join us

राजकुमारी … करणार का वार्तापूरावर राज्य ??, अप्सरा सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:25 IST

Tamasha Live :‘तमाशा लाईव्ह’ सिनेमात सोनाली एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live ) या एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव असे अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा अन्य चित्रपटांपासून काहीशी वेगळी असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. 

सोनाली यात शेफालीची भूमिका साकारतेय. सोशल मीडियावर तिने यातील एक फोटो शेअर केला आहे. राजकुमारी  … करणार का वार्तापूरावर राज्य ?? काय वाटतं ? असं कॅप्शनसह तीन फोटो शेअर केले आहेत. क्वीन, ब्युटीफुल अशा कमेंट्स चाहत्यांनी या फोटोवर केल्या आहेत. 

‘तमाशा लाईव्ह’ सिनेमात सोनाली एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. पत्रकार शेफाली असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.‘तमाशा लाईव्ह’ या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह सचित पाटील, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव , भरत जाधव अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

तर संजय जाधव यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये सिनेमासाठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. तमाशा लाईव्ह या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सिनेमात नांदी हा प्रकार पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटी