Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील अर्जुन होता बॉडी बिल्डर असा सुरु झाला त्याचा अभिनयाचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 13:30 IST

२००६ पासून रोहितने बॉडी बिल्डिंगच प्रशिक्षण सुरु केले आणि राष्ट्रीय स्तरावर खूप पारितोषिक ही पटकावले आहेत.

प्रत्येक माणसाकडे काहींना काही गुणवत्ता असतातच आणि त्याचे ते गुण आणि कौशल्य त्याला सर्वांपेक्षा वेगळं बनवतात. काही लोक त्या गोष्टी शिकतात तर काहींच्या रक्तातच ते गुण असतात.  झी मराठीवर 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत  अर्जुनची भूमिका निभावणारा रोहित परशुराम,  तो सर्वगुण संपन्न मुलगा आहे ज्याच्या कलेचं कौतुक करू तितकं कमी. रोहितशी त्याच्या कलांबद्दल गप्पा मारताना कळले की अभिनेता होण्याच्या पलीकडे रोहितच्या आयुष्यात खूप काही घडले आहे. शाळेत असताना रोहित वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक पटकवायचा, तिथून घडत गेला हा कलाकार, वक्तृत्व मध्ये अव्वल असल्यामुळे कॉलेज मध्ये सूत्रसंचालन करण्याची त्याला संधी मिळाली. 

रोहितच्या फक्त जिभेवर सरस्वती विराजमान नाही तर त्याला बजरंगबलीचा आशिर्वाद ही आहे. २०१७ मध्ये रोहित मिस्टर इंडियाच्या  स्पर्धेमध्ये खेळला. २००६ पासून रोहितने बॉडी बिल्डिंगच प्रशिक्षण सुरु केले आणि राष्ट्रीय स्तरावर खूप पारितोषिक ही पटकावले आहेत. त्यानंतर त्याने  पुण्याला स्वतःची व्यायामशाळा सुरु केली. जवळ पास ६५० प्रशिक्षणार्थी होते जे त्याच्या हाता खाली प्रशिक्षण घेत होते.  हे सर्व सांगताना रोहित म्हणाला मी अभिमानाने सांगू शकतो की मी एक चांगला आहार तज्ञ आहे आणि आज ही मी काही लोकांना डाएट प्लॅन सांगोत. हे सर्व होतं असताना  २०१८ ला माझ्या आयुष्यात एक नवीन वळण आले माझी भेट झाली माझ्या आतल्या कलाकाराची आणि तिथून सुरु झाला  ऍक्टिंगचा प्रवास. मी विक्रम गोखले गुरुजींचा विध्यार्थी आहे. त्यांच्या कडून ह्या कलेचा अभ्यास केला आणि स्वप्नांच्या शहरात म्हणजेच मुंबईला आलो. 

मुंबईला आल्यावर सर्वात पहिले शाहरुख खानच्या 'मन्नत' वर गेलो आणि ऍक्टिंग करियरची सुरवात केली. मी शाहरुख खानचा खूप मोठा प्रशंसक आहे. मला ते कलाकार आणि एक उत्तम माणूस म्हणून खूप आवडतात. आपल्या परिवारावर इतका प्रेम करतातं त्यांची ती बाजूही मला खूप आवडते. नुकतेच  झी मराठी अवॉर्ड्स होऊन गेले आणि ज्या दिवशी अवॉर्ड्स झाले त्या दिवशीही मी वांद्राला मन्नतवर जाऊन आलो. मला आत्मविश्वास आहे की मी कधी न कधी त्यांच्या सोबत असणार. मला आवर्जून सांगावस वाटतंय की लहानपणी डान्स कॉम्पिटिशन मध्ये मी शाहरुख खानच्या गाण्यांवर  नाचून  पारितोषिक मिळवले आहे. सोशल मीडियावर रोहितच्या घरगुती कला ही खूप दिसून येतात त्याच्या मागे जी व्यक्ती आहे ती म्हणजे रोहितची अर्धांगिनी. रोहितच म्हणणं आहे की माझ्या लग्नानंतरच्या आयुष्याची शिल्पकार  माझी बायको पूजा आहे. मी पाककला कोल्हापूरच्या तालमीत होतो तेव्हा शिकलो पण पुरणपोळी मला पूजाने शिकवली. वडिलांचे हॉटेल असल्यामुळे सणावाराला मी तिथे रांगोळी काढायचो. मी परमेश्वराचे खूप आभार मानतो की त्यांनी मला क्षमता दिली आहे की मी लवकर गोष्टी बघून शिकतो. 

टॅग्स :झी मराठी