Join us
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्वा नेमळेकरने थाटला नवा संसार, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी बांधली लग्नगाठ, कोण आहे तिचा जोडीदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 08:30 IST

Apoorva Nemlekar News: बिग बॉस ४ मधील उपविजेती आणि झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेमधील ‘शेवंता’ या पात्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने नव्या संसाराला सुरुवात केली आहे. तिने अनूज गोवळकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे,

बिग बॉस ४ मधील उपविजेती आणि झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेमधील ‘शेवंता’ या पात्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने नव्या संसाराला सुरुवात केली आहे. तिने अनूज गोवळकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली असून,  रविवारी सोशल मीडियावर आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत अपूर्वाने तिच्या चाहत्यांना ही खूशखबर दिली.

आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती देताना लिहिलेल्या पोस्टमध्ये अपूर्वा म्हणाली की, १४ फेब्रुवारी २०२६ ही तारीख माझ्यासाठी कायमची आठवणीत राहणारी ठरली आहे. काल प्रेम, श्रद्धा आणि जवळच्या व्यक्तींच्या साक्षीने आम्ही आमच्या जीवनातील एका नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. मी आता सौ. अपूर्वा तनुज गोवळकर झाले  आहे, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे.

अपूर्वाने पुढे लिहिले की, गेल्या काही काळाता आयुष्याने माझी परीक्षा घेतली. मला कधी घडवलं तर कधी खचवलं, तर कधी पुन्हा उभं केलं. मात्र तरीही माझा प्रेमावरचा विश्वास कधीही कमी झाला नाही. अनेक वादळं अनुभवल्यानंतर देवाने मला शांततेची अनुभूती दिली आहे. प्रदीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर त्याने मला साथ दिली. तसेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी माझ्या प्रेमाला त्याचं घर सापडलं.

ही आमची दुसऱ्या डावाची सुरुवात आहे. तसेच ती आम्ही प्रगल्भता, सामंजस्य आमि एकमेकांबाबत असलेल्या आदराच्या माध्यमातून निवडली आहे. अत्यंत आनंदाने हात जोडून आम्ही तुमच्या आशीर्वादांच्या, प्रेमाच्या आणि शुभेच्छाच्या अपेक्षेने  या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत, असे सांगत अपूर्वा हिने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासोबत राहिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. तसेच आज मला पूर्णत्व लाभल्यासारखे वाटत आहे. मी खूप कृतज्ञ आणि आनंदी आहे, असेही ती आभार मानताना म्हणाली.

दरम्यान, अपूर्वा नेमळेकर हिचं पहिलं लग्न रोहन देशपांडे यांच्याशी झालं होतं. २०१४ साली त्यांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नव्हतं. लवकरच त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर बरीच वर्षे ती सिंगल होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Apurva Nemlekar Ties the Knot on Valentine's Day!

Web Summary : Apurva Nemlekar, famed for 'Shevanta,' married Anuj Gowalkar on Valentine's Day. Sharing photos, she announced her new beginning, expressing gratitude and happiness after past trials. This is her second marriage.
टॅग्स :अपूर्वा नेमळेकरमराठी अभिनेताटेलिव्हिजनशुभविवाह