Join us
Daily Top 2Weekly Top 5

पब्लिसिटी के लिए कुछ भी ! अभिनेत्रीने केल्या सगळ्याच हद्द पार, बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 16:52 IST

काहींना तिचा असा अंदाज रुचला नसला तरी काही  नेटिझन्सना तिने अक्षरक्षा वेड लावलं आहे. अदा शर्माच्या या टॉपलेस फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. 

अनेकदा सेलिब्रेटींना त्याच्या नावाचीच चर्चा व्हावी किंवा मग सतत चर्चेत राहणे खूप आवडते. त्यामुळे विविध गोष्टी करत फोटोशूट करण्याचा ट्रेंडही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी, त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माच्या बोल्ड अदा पाहून चाहत्यांचीही नजर हटत नाहीय. हा फोटो पाहून युजर्स विचित्र कमेंट करत तिच्यावर संताप व्यक्त करत आहेत. 

या फोटोमध्ये अदाने गळ्यात केवळ फुलांची माळा घातली आहे. त्यामुळे अतिशय बोल्ड फोटो शेअर करत तिने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेण्यात ती यशस्वी ठरली आहे. त्यामुळे तिच्या सिनेमांपेक्षा ती बोल्ड फोटोशूटमुळेच जास्त चर्चेत असते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पहिल्यांदाच तिने असे फोटोशूट केले आहे असे नाही.

 

यापूर्वी देखील तिने असे फोटोशूट करत सगळ्यांना चक्रावून टाकले होते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. काहींना तिचा असा अंदाज रुचला नसला तरी काही  नेटिझन्सना तिने अक्षरक्षा वेड लावलं आहे. अदा शर्माच्या या टॉपलेस फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. 

अदाने बॉलिवूडमध्ये 2008 साली आलेल्या ‘1920’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली. यानंतर ‘हम है राही यार के’ आणि ‘हंसी तो फंसी’ या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या. ‘कमांडो 3’या सिनेमातही अदा झळकली होती. यात विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत होता. याशिवाय अंगीर धर आणि गुलशन देवैया यासारखे कलाकार स्क्रीन शेअर करताना दिसले होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जरी अदा काम करत असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला आहे. तिला हिंदी, इंग्लिश आणि तमीळ भाषेचे चांगले ज्ञान आहे.

टॅग्स :अदा शर्मा