Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोटे उस्ताद फेम अन्वेषाचे मन हे वेडे का पुन्हा, सांग ना… हे गाणे ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 16:10 IST

कुमार वयातच ‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत.

ठळक मुद्देअन्वेषाचा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या अल्बममधील सगळीच गाणी तिने अतिशय तरल आवाजात गायली असून हा अल्बम रसिकांमध्ये लोकप्रिय होताना दिसतो आहे. 

मन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना…हे मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारे रोमँटिक साँग काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. कवयित्री वैशाली मराठे यांनी लिहिलेल्या गीताला जीवन मराठे यांनी संगीत दिले असून प्रसिद्ध गायिका अन्वेषा हिने या गीताला स्वरसाज चढविला आहे. संगीत-संयोजन वरुण बिडये यांचे आहे तर तांत्रिक बाजू अनिल शिंदे यांनी सांभाळली आहे. या अल्बमची निर्मिती श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली आहे.

कुमार वयातच ‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. गोलमाल रिर्टन्स, रिव्होल्वर राणी, रांजणा, प्रेम रतन धन पायो यांसारख्या हिंदी चित्रपटात तिने गायलेली सगळीच गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली आहेत. यापूर्वी अन्वेषाच्या आवाजातील बबन चित्रपटातील मराठी गीतांना रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. तसेच एक अलबेला या चित्रपटातील भोले सुरत दिल के खोटे हे गाणे देखील तिने गायले होते. आपल्या अनेक गाण्याद्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अन्वेषाचा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या अल्बममधील सगळीच गाणी तिने अतिशय तरल आवाजात गायली असून हा अल्बम रसिकांमध्ये लोकप्रिय होताना दिसतो आहे. 

‘मन हे वेडे….’ या अल्बममधील सगळीच गाणे ऐकण्यासाठी खूप सुंदर वाटत असली तरी, त्याची पडद्यामागील मेहनत खूप मोठी होती. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले श्रीनिवास कुलकर्णी यांचे निर्मिती हे लहानपणापासूनचे स्वप्न होते, लातूरसारख्या दुष्काळी भागातून येऊन हे सहकार्यांच्या साथीने हे स्वप्न साकार करता आल्याचा आनंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लवकरच या गाण्याचं फ्लूट व्हर्जन आणि व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे. हे व्हिडीओ देखील प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकेल अशी अन्वेषा आणि तिच्या टीमला खात्री आहे.

टॅग्स :अन्वेषा