अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अनेकदा त्यांची मुलगी वामिकासह व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात. व्हॅकेशन दरम्यानचे फोटो दोघेही शेअर करतात पण आजपर्यंत त्यांनी मुलीचा चेहरा दाखवला नाही. सध्या हे स्टार कपल हे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दुबईमध्ये आहे आणि आपल्या मुलीसोबत तेथील निसर्गच्या सौंदर्याचा आनंद लुटत आहेत. विराट आणि अनुष्का दुबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
अनुष्का शर्मा (Anushka Sharma)ने तिच्या चाहत्यांसाठी दुबईतील व्हॅकेशनची झलक दाखवली आहे. अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्यांच्या हॉटेलच्या टेरेसवरून उगवत्या सूर्याचा आनंद घेत दुबईतील शांत टेरेसचा फोटो पोस्ट केला. अनुष्का विराटप्रमाणे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपल्या पार्टनरसोबत देशात आणि परेदशात गेले आहेत.
2002 साली झुलन गोस्वामीचं भारतीय संघात पदार्पण झालं आणि एक उत्तम ऑलराउंडर म्हणून तिचा उदय झाला. ती उत्तम बॉलर तर होतीच पण तिची बॅटही झकास काम करते. 2007 साली आयसीसीच्या उत्तम खेळाडूंच्या यादीत एकही भारतीय पुरुष क्रिकेटपटू नव्हता, त्यावेळी आसीसी प्लेअर ऑफ द इयर म्हणून गौरवलेली झुलन ही एकमेव क्रिकेटपटू. झुलनचा संघर्ष तिची जिद्दी आणि तिचं सातत्यपूर्ण पॅशन, हे सारं अत्यंत प्रेरणादायी आहे. अनुष्काचा ‘चकदा एक्स्प्रेस’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.