Join us

19 चित्रपट त्यातील 3 ठरले फ्लॉप, तरीदेखील इतक्या कोटींची मालकीण आहे अनुष्का शर्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 17:59 IST

अभिनेत्री अनुष्का शर्माने आतापर्यंत फक्त 19 चित्रपटात काम केले आहे. त्यातील तीन चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

बॉलिवूड चित्रपटांना फक्त भारतातच नाही तर परदेशातही खूप पसंती मिळते आहे. बॉलिवूड चित्रपटांच्या कमाईसोबतच कलाकारांच्या मानधनातही दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने आतापर्यंत फक्त 19 चित्रपटात काम केले आहे. त्यातील तीन चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. तरीदेखील ती 227 कोटींची मालकीण आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माने 2017मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्न केले. अनुष्का आणि विराटचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. अनुष्काने लग्नानंतर एकाही चित्रपटात काम केले नाही.

अनुष्का शर्माने रबने बना दी जोडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तिने 19 चित्रपटात काम केले. त्यातील तीन चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माची एकूण संपत्ती 227 कोटी रुपये आहे. तिने पदार्पण केलेल्या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. 

आतापर्यंत अनुष्काने रबने बना दी जोडी, पीके, ए दिल है मुश्किल, झिरो, सुलतान यासारख्या चित्रपटात झळकली आहे. अनुष्का शर्माचा जन्म 1 मे, 1988मध्ये अयोध्या येथे झाला. आता ती 31 वर्षांची आहे.

अनुष्का शर्मा नेहमी नवरा विराट कोहलीसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत असते. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्यात जवळीकता एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान वाढली. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. तसेच नुकतेच त्या दोघांनी घरी नवीन पाहुणा येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली