Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नेंट अनुष्का शर्मा पोहोचली विराट कोहलीला सपोर्ट करायला, दिसली बेबी बम्प फ्लॉन्ट करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 11:57 IST

प्रेग्नेंट अनुष्का शर्मा पती विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती.

शुक्रवारी प्रेग्नेंटअनुष्का शर्मा पती विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर आली होती. स्टेडियममधील अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनुष्काने यावेळी रेड कलरचा ड्रेस घातला आहे ज्यात तिचे बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली. अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर आलेला प्रेग्नेंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसत होता. अनुष्का स्टेडियमवर वेगवेगळ्या मूडमध्ये दिसली, कधी एक्सायटेड तर कधी फोनमध्ये बिझी. 

अनुष्काने अलीकडेच दुबईमध्ये विराटचा बर्थ डे सेलिब्रेट केला. अनुष्काने आरसीबीच्या टीमसोबत विराटच्या बर्थ डेचे सेलिब्रेशन केले. तर अनुष्काने विराटसोबचा रोमाँटिक फोटो शेअर केला होता.  विराट अनुष्काची विशेष काळजी घेतोय.  

नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. विराट मैदानात, तर अनुष्का स्टेडियममध्ये. त्यामुळे दोघांमध्ये खाणाखुणांच्या माध्यमातून संवाद झालाय.

मैदानात आपल्या संघासोबत असलेला कोहली अनुष्काला 'जेवलीस का?' विचारतोय. त्यावर अनुष्का हसत हसत थम्स अप करून 'हो' असं उत्तर देतेय. विराट कोहली आणि अनुष्का यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दोघेही कामाव्यतिरिक्त त्यांचा क्वॉलिटी टाईमही एन्जॉय करताना पाहाला मिळतात. जानेवारीत आम्ही दोनाचे तीन होऊ, अशी घोषणा दोघांनी काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवरून केली आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली