Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराटसह नाहीतर जवळच्या व्यक्तिंसह निवांत क्षण एन्जॉय करतेय अनुष्का शर्मा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 19:00 IST

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आपली गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यापासून सोशल मीडियावर केवळ या जोडप्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

आयपीएल २०२० दरम्यान दुबईमध्ये पती विराट कोहलीसोबत बराच वेळ घालवल्यानंतर अनुष्का शर्मा मुंबईत परतली आहे. येथे ती तिच्या पालकांह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. नेहमीच विराटसह दिसणारी अनुष्काने आता तिच्या पालकांसह निवांत क्षण एन्जॉय करतानाची काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहेत.  फोटो शेअर करुन अनुष्काने तिची एक झलक दाखवली होती.

अनुष्का शर्माने संध्याकाळी  आरामात गप्पा गोष्टी करत असल्याचा तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये  गुलाबी रंगाच्या सलवार-सूटमध्ये तिच्या सौंदर्यांला चारचाँद लागले आहेत. अनुष्का बाल्कनीच्या खुर्चीवर विश्रांती घेत आणि कॅमेर्‍याकडे पहात हसताना दिसतेय. त्याच वेळी, तिच्या वडिलांचे प्रतिबिंब देखील आरशात दिसतेय. यावर अनुष्काने या फोटो  एक समर्पक असे कॅप्शनही लिहिले आहे. अनुष्काचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. यावर सेलेब्सनीही कमेंट करत पसंती दिली आहे  यापूर्वीही अनुष्काने दिवाळीच्या दिवशी पारंपारिक ड्रेसमध्ये फोटो शेअर केले होते. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आपली गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यापासून सोशल मीडियावर केवळ या जोडप्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. गुड न्यूज जाहीर केल्यापासून ते आतापर्यंत अनुष्का आपले स्टायलिश आणि मोहक अवतार चाहत्यांना पाहायला मिळतोय. पोलका डॉच फ्रिल ड्रेसपासून ते  डंगरीपर्यंत अनुष्काच्या वॉर्डरोब एकापेक्षा एक सुंदर फॅशनेबल मॅटर्निटी ड्रेस पाहायला मिळत आहेत.

VIDEO: लाखो मराठी तरुण तरुणींना विचारतात; तोच प्रश्न विराट अनुष्काला विचारतो तेव्हा

जेवलीस का..? याच प्रश्नामुळे अनेक मुलांचा संवाद सुरू होता. याच प्रश्नामुळे काहींचं जुळतंदेखील. या प्रश्न तसा फारसा टाळता नाही. याशिवाय या प्रश्नात काळजीदेखील आहे. त्यामुळे या प्रश्नामुळे संवादाची गाडी पुढे सरकण्याची शक्यताही जास्त असते. लाखो मराठी तरुण तरुणींना विचारत असलेला हाच प्रश्न आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीनं त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला विचारला आहे. तोही थेट अगदी मैदानावरून.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली