Join us
Daily Top 2Weekly Top 5

एथनिक लूकमधला अनुष्काने शेअर केला फोटो, पुन्हा दिसली बेबी बंम्प फ्लॉन्ट करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 16:41 IST

बेबी बंम्प असलेले फोटोही ती शेअर करत असते. या फोटोत स्मित हास्य, डोळ्यात नवं तेज आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे.या फोटोवर अनुष्काच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने घरी पती विराट कोहलीसोबत दिवाळी साजरी केली. अनुष्काने इन्स्टावर तिच्या दिवाळी लूकचा एक फोटो शेअर केला आहे. एथनिक लूकमधला क्रीम व्हाईट आउटफिटमध्ये ती अधिक सुंदर दिसत आहे. अनुष्का शर्माने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.  मी घरी बसून मस्त फराळावर ताव मारणार आहे. मजा आली. आशा आहे की आपणा सर्वांची दिवाळी आनंदात भरभराटीची जाओ.

चाहत्यांसह सेलेब्सही अनुष्काच्या या फोटोंवर कमेंट करत आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंमधल्या अदा पाहून तुम्हीही फिदा व्हाल अशाच तिने पोजवर पोज दिल्या आहेत. अनुष्काच्या चेह-यावर प्रेग्नन्सीचा आलेला ग्लो  स्पष्ट दिसत आहे. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे तिने लक्ष वेधून घेतले आहे. अनुष्का सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते.

नेहमीच सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करते. तसंच आपल्या आगामी प्रोजेक्टसची माहिती चाहत्यांसोबत शेअर करते. शध्या अनुष्का आपली प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. बेबी बंम्प असलेले फोटोही ती शेअर करत असते. या फोटोत स्मित हास्य, डोळ्यात नवं तेज आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे.या फोटोवर अनुष्काच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. 

प्रेग्नेंट अनुष्का शर्मा पोहोचली विराट कोहलीला सपोर्ट करायला, दिसली बेबी बम्प फ्लॉन्ट करताना

अनुष्काने अलीकडेच दुबईमध्ये विराटचा बर्थ डे सेलिब्रेट केला. अनुष्काने आरसीबीच्या टीमसोबत विराटच्या बर्थ डेचे सेलिब्रेशन केले. तर अनुष्काने विराटसोबचा रोमाँटिक फोटो शेअर केला होता. विराट अनुष्काची विशेष काळजी घेतोय.नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. विराट मैदानात, तर अनुष्का स्टेडियममध्ये. त्यामुळे दोघांमध्ये खाणाखुणांच्या माध्यमातून संवाद झालाय.मैदानात आपल्या संघासोबत असलेला कोहली अनुष्काला 'जेवलीस का?' विचारतोय. त्यावर अनुष्का हसत हसत थम्स अप करून 'हो' असं उत्तर देतेय.

 

विराट कोहली आणि अनुष्का यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दोघेही कामाव्यतिरिक्त त्यांचा क्वॉलिटी टाईमही एन्जॉय करताना पाहाला मिळतात. जानेवारीत आम्ही दोनाचे तीन होऊ, अशी घोषणा दोघांनी काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवरून केली आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली