Join us

ट्रोलर्स मला बलात्काराची धमकी देत होते...! अनुराग कश्यपची मुलगी आलियाने सांगितले ट्रोलिंगचे दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 13:48 IST

अलीकडे आलियाने काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर आलिया जबरदस्त ट्रोल झाली होती.

ठळक मुद्देआलिया ही अनुराग कश्यप व त्याची एक्स-वाईफ आरती बजाजची मुलगी आहे. आलिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना ट्रोलिंग सहन करावे लागते. अनेकदा सेलिब्रिटीच नाही तर त्यांचे कुटुंबीय सुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप त्यापैकीच एक. अलीकडे आलियाने काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर आलिया जबरदस्त ट्रोल झाली होती. आता तिने तिच्या युट्यूब चॅनलवर ट्रोलिंगबद्दलचे दु:ख व्यक्त केले आहे.आलिया ही अनुराग कश्यप व त्याची एक्स-वाईफ आरती बजाजची मुलगी आहे. आलिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

काय म्हणाली आलिया...

सोशल मीडियावरची नकारात्मकता मी जवळून अनुभवली आहे. मी अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे. सोशल मीडियावरच्या छोट्या छोट्या नकारात्मक कमेंट्सही माझ्यासाठी त्रासदायक का ठरतात, मला ठाऊक नाही. या कमेंट्समुळे मला इतका त्रास होता की, जवळजवळ रोजच मी रडते. तुला भारतीय असल्याची लाज वाटायला हवी, असे लोक मला म्हणाले. मला बलात्काराची धमकी दिली. मला वेश्या म्हटले. तुझा रेट काय? असले घाणेरडे प्रश्न केलेत. त्या कमेंट्स खूप त्रासदायक होत्या. हळूहळू या नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष करण्याचे मी शिकतेय. अशा ट्रोलर्सला अलीकडे मी थेट ब्लॉक करते. फोनच्या मागे लपून हे लोक ट्रोल करतात. अशी चेहरा लपवून नकारात्मकता पसरवणारे लोक मला माझ्या सोशल मीडियावर नको आहेत. माझा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सकारात्मक राहावा, अशी माझी इच्छा आहे, असे आलिया म्हणाली.

बॉलिवूडमध्ये येण्याचा इरादा नाही...मी एका दिग्दर्शकाची मुलगी असली तरी ख-या आयुष्यात मी अजिबात ग्लॅमर अनुभवलेले नाही. माझे पापा जे सिनेमे बनवतात, ते फार कमर्शिअल नसतात. बॉलिवूडचे मला काहीही के्रज नाही. उलट या झगमटापासून दूर राहण्याचाच माझा प्रयत्न असतो, असेही तिने सांगितले.

टॅग्स :अनुराग कश्यप