Join us
Daily Top 2Weekly Top 5

Metro इन दिनो! फ्रेश जोडी आणि जबरदस्त स्टारकास्टसह अनुराग बासूच्या नव्या सिनेमाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 12:38 IST

अनुराग बासूने 'मेट्रो..इन दिनो' आपल्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.  यामध्ये चाहत्यांना एक फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे

Metro इन दिनो : बॉलिवुड दिग्दर्शक अनुराग बासूचा प्रत्येक सिनेमा हा हटके असतो. अनेक कलाकारांना घेऊन त्यांच्यातील गुंतागुंतीचे नातेसंबंध दाखवणे हे अनुरागच्या सिनेमातील खास वैशिष्ट्य असते. आता अनुराग बासूने 'मेट्रो..इन दिनो' आपल्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.  यामध्ये चाहत्यांना एक फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे ती म्हणजे 'सारा अली खान आणि आदित्य रॉय कपुर'. सिनेमाचे शुटिंग लवकरच सुरु होणार आहे.

अनुराग बासूचा 'लाईफ इन अ मेट्रो' हा सिनेमा प्रचंड गाजला होता. सिनेमाची कहाणी, कलाकारांचा अभिनय आणि विशेष म्हणजे चित्रपटातील गाणी तुफान हिट झाली होती. मात्र मेट्रो..इन दिनो हा लाईफ इन अ मेट्रो चा सीक्वेल नाही. 

सारा अली खान ने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत 'मेट्रो.. इन दिनो' या नव्या सिनेमाची घोषणा केली. तसेच या टीमसोबत काम करण्यास खुप उत्सुक असल्याचे कॅप्शन लिहिले. तिने एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात अनुराग बासू, आदित्य रॉय कपुर, प्रितम आणि भुषण कुमारही दिसत आहेत.

सारा अली खान आणि आदित्य रॉय कपुर शिवाय चित्रपटात अन्य स्टारकास्ट देखील आहे. अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन, अली फजल, फातिमा सना शेख हे देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. भुषण कुमार चित्रपटाचे निर्मितीखाली चित्रपटाचे शुटिंग सुरु होणार आहे. तर सर्वांचा लाडका प्रितमचे म्युझिक असणार आहे.  

टॅग्स :सिनेमासारा अली खानआदित्य रॉय कपूरपंकज त्रिपाठीप्रीतमभुषण कुमार