Join us
Daily Top 2Weekly Top 5

रामललाच्या दर्शनासाठी अनुपम खेर चेहरा लपवून का गेले? मंदिरातील व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 14:10 IST

चेहरा लपवत रामललाचं दर्शन घेण्यासाठी राम मंदिरात पोहोचले अनुपम खेर, व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. केवळ देशभरच नव्हे तर जगभरात या सोहळ्याची चर्चा होती. विविध क्षेत्रातील दिग्गजांबरोबर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेरहीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले होते. पण, राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचं आमंत्रण असूनही अनुपम खेर यांना तोंड लपवत रामललाचं दर्शन घेण्यासाठी जावं लागलं. 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर दुसऱ्या दिवशी रामललाचं दर्शन घेण्यासाठी अनुपम खेर राम मंदिरात तोंड लपवून गेले होते. यावेळी राम मंदिरातील अद्भुत दृश्य पाहून ते आश्चर्यचकित झाले. राम मंदिरातील व्हिडिओ शेअर करत त्यांनी याचा अनुभव शेअर केला आहे. या व्हिडिओत अनुपम खेर यांनी चेहरा लपवल्याचं दिसत आहे. "कृपया शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा", असं कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिलं आहे. राम मंदिरातील रामललाचं दर्शन घेण्याचा अनुभवही त्यांनी पोस्टद्वारे शेअर केला आहे. 

"मी काल आमंत्रण दिलेले पाहुणा म्हणून राम मंदिरात गेलो होतो. पण, आज सगळ्यांबरोबर लपून छपून मंदिरात गेलो. मंदिरातील भक्तिमय वातावरण पाहून मला भरून आलं. जेव्हा मी तिथून निघालो तेव्हा एकाने मला कानात सांगितलं की तोंड लपवून काही होणार नाही. रामललाने तुम्हाला ओळखलं आहे," असं अनुपम खेर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.  त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

अनुपम खेर यांच्याबरोबर अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन, आलिया भट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, रोहित शेट्टी, रजनीकांत या सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर २३ जानेवारीपासून राम मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. 

टॅग्स :अनुपम खेरराम मंदिरअयोध्या