Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोघांत जुंपली...!! नसीरूद्दीन यांनी म्हटले ‘जोकर’, आता अनुपम खेर यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 10:47 IST

ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्यात सध्या चांगलीच जुंपलीय.

ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्यात सध्या चांगलीच जुंपलीय. होय, नसीरूद्दीन यांनी अनुपम यांना ‘जोकर’ म्हणून हिणवले. अनुपम यांना फार गंभीरपणे घेण्याची गरज नसल्याचे म्हटले. या टीकेवर आता अनुपम यांनी नसीरूद्दीन यांच्यावर पलटवार केला आहे. नसीर यांच्या टीकेला उत्तर देणारा एक व्हिडीओच अनुपम यांनी शेअर केला.‘जनाब, नसीरूद्दीन शाह साब के लिए मेरा प्यार भरा पैगाम... ते माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत. मी त्यांचा नेहमीच आदर करत आलोय आणि करत राहिल. पण कधी कधी काही गोष्टींचे उत्तर देणे गरजेचे असते, हे माझे उत्तर....,’ अशा शब्दांत सुरुवात करत, अनुपम यांनी नसीरूद्दीन यांच्यावर तोफ डागली.

काय म्हणाले होते नसीरूद्दीन...एका मुलाखतीत नसीरूद्दीन यांनी अनुपम खेर यांना फार गंभीरपणे घेण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. सीएए विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. मी Twitterवर नाही. अनुपम खेर सारखे लोक फार बडबड करतात.   अनुपम खेर एक जोकर आहेत. त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही.  तो एकप्रकारचा मनोरूग्ण आहे.  एफटीआयआयमध्ये त्यांच्याबरोबर असणारेही हे सांगतील. हे त्याच्या रक्तातच आहे', असे नसीरुद्दीन म्हणाले होते.

अनुपम यांनी असे दिले उत्तर...

नासीरुद्दीन यांना पहिल्यापासून टीका करायची सवय आहे. तुम्ही आतापर्यंत अमिताभ, शाहरुख, राजेश खन्ना, विराट कोहली अशांवरही टीका केली आहे आणि यापैकी कोणी तुमचे म्हणणे गांभीर्याने घेतलेले नाही. कारण तुम्ही बोलताय यात तुमचा दोष नाही. तुम्ही वषार्नुवर्षे ज्या पदार्थांचं सेवन करता त्यामुळे काय बरोबर काय चूक याचा तुमचा तुम्हालाच पत्ता लागत नाही. प्रचंड यश मिळवल्यानंतरही तुम्ही तुमचे आयुष्य नैराश्यात घालवले. त्यातून या टीका होत असाव्यात. मी तुमची टीका अजिबात गांभीर्याने घेणार नाही. जनाब नासीरजी, माझ्या रक्तात हिंदुस्थान आहे, हे फक्त समजून घ्या, असा टोलाही अनुपम यांनी हाणला.

 

टॅग्स :अनुपम खेरनसिरुद्दीन शाह