Join us

 अखेर अनुप जलोटांनी बांधले ‘बाशिंग’, नवरीला पाहून लोक हैराण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 16:31 IST

अनुप एक रूप अनेक ...

बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये एका जोडीने सर्वांना आश्चयार्चा धक्का दिला होता. ही जोडी होती भजन सम्राट अनुप जलोटा व जसलीन मथारू यांची. एकमेकांचे गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड म्हणून अनुप जलोटा व जसलीन मथारू यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. अर्थात घरातून बाहेर पडल्यानंतर हा सगळा ड्रामा होता हे सिद्ध झाले होते. या सगळ्या ड्रामेबाजीनंतर अनुप जलोटा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. होय, त्यांनी पुन्हा असे काही केले की, पुन्हा त्यांची चर्चा होतेय. त्यांचे नवे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोत भजनसम्राट अनुप जलोटा नवदेवाच्या वेषात आहेत. तर त्यांच्या बाजूला दोन मुली वरमाला घेऊन उभ्या आहेत.

आता ही काय भानगड आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही भानगड नाही तर एक कमर्शिअल फोटोशूट आहे. होय, अनुप जलोटा एका नव्या मॅट्रिमोनियल साईटसाईटचे ब्रँड  अ‍ॅम्बेसेडर बनले आहेत. या साईटच्या प्रचारासाठी त्यांनी हे नवे फोटोशूट केले.

अनुप यांनी जसलीन मथारु या आपल्या शिष्येसोबत ‘बिग बॉस 12’मध्ये एन्ट्री घेतली होती आणि आम्ही दोघेही गत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत, असे सांगून एकच धमाका केला होता. अर्थात  ‘बिग बॉस 12’च्या घरात अनुप व जसलीन यांच्यातील केमिस्ट्री कुठेही दिसली नव्हती. यानंतर  जसलीन माझी गर्लफ्रेन्ड नाही. ते फक्त बिग बॉससाठी केलेले नाटक होते. ती माझी फक्त आणि फक्त शिष्या आहे, असा खुलासा अनुप यांनी केला होता.  

टॅग्स :अनुप जलोटा