Join us

अनुकृती वास ठरली 'मिस इंडिया 2018'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 16:56 IST

तामिळनाडूची सौंदर्यवती अनुकृती वास हिने यंदाच्या मिस इंडिया 2018 चे विजेतेपद पटकावले. अनुकृती हिने 29 प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

मुंबई -  तामिळनाडूची सौंदर्यवती अनुकृती  वास हिने यंदाच्या मिस इंडिया 2018 चे विजेतेपद पटकावले. अनुकृती हिने   29 प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. गतविजेती आणि मिस वर्ल्ड मनुषी छिल्लर हिने अनुकृतीच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकूट सजवला. या स्पर्धेत हरयाणाची मीनाक्षी चौधरी दुसऱ्या तर आंध्र प्रदेशची श्रेया राव तिसऱ्या स्थानावर राहिली. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया 2018 ची अंतिम फेरी मंगळवारी रात्री मुंबईतील एनएसईआय, वरळी येथे संपन्न झाली. दिग्गज फिल्मस्टार्सच्या उपस्थितीत झालेल्या रंगलेल्या अंतिम फेरीत देशाच्या विविध भागातून आलेल्या सौंदर्यवतींनी विजेतेपदासाठी आपली दावेदारी सादर केली. अखेरीस अनुकीर्तीने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करत जेतेपद पटकावले. 

तामिळनाडूतील रहिवासी असलेल्या अनुकृतीचा सांभाळ तिच्या आईने केला आहे. अनुकीर्ती ही पेशाने खेळाडू आणि नृत्यांगना आहे. तसेच आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती फ्रेंच भाषेची पदवी घेत आहे. तसेच तिला दुचाकी चालवण्याचा छंद आहे. भविष्यात सुपर मॉडेल बनण्याचे तिचे स्वप्न आहे.  

 

टॅग्स :तामिळनाडू