Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुजा साठ्येचा अंदाज तुम्हालाही करेल घायाळ, SEE PICS

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 18:16 IST

संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात भिऊबाई ही भूमिका अनुजाने साकारली होती.

आपल्या अभिनयाने मराठी कलाकार वर्षानुवर्षे हिंदी रसिकांची मने जिंकत आहेत. या गोष्टीला आजची तरुण पीढीही अपवाद नाही. मराठी मोठा पडदा आणि छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री अनुजा साठे हिच्याबाबतसुद्धा ही बाब तंतोतंत लागू पडते. संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात भिऊबाई ही भूमिका अनुजाने साकारली होती. तिच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झालं. अनुजा साठे ही मराठी अभिनेता सौरभ गोखले याची पत्नी आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर रसिकांची तुफान पसंती मिळवत असतात. पती पत्नीचे नातं कसं असावं हेच जणू या दोघांचे फोटोमधून पाहायला मिळते.

अनुजा आणि सौरभ चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. रेशीमगाठीत अडकण्याआधी दोघे खूप चांगले मित्र होते. त्यामुळंच की त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. 

सौरभ आणि अनुजा यांचा प्रेमविवाह झाला असून मांडला दोन घडींचा डाव या मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि मग दोघंही रेशीमगाठीत अडकले. आपल्या अभिनयाने अनुजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'अग्निहोत्र', 'मांडला दोन घडीचा डाव', 'लगोरी मैत्री रिटर्न्स', 'विसावा','तमन्ना' अशा मालिकांमध्ये ती झळकली होती. 'असा मी अशी ती', 'राखणदार', 'भोभो', 'कॉफी आणि बरंच काही', 'घंटा' या सिनेमातही अनुजा झळकली आहे.

अनुजा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अनुजाचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.

टॅग्स :अनुजा साठेसौरभ गोखले