Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनुने घेतला धाडसी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 16:18 IST

अनु आणि सिध्दार्थची हळूहळू फुलणारी मैत्री, सिध्दार्थ आणि दुर्गा आई मुलाचं नात. दुसरीकडे हरी आणि अनुची मैत्री हळूहळू घट्ट होऊ लागली आहे.

ठळक मुद्देमालिकेमध्ये आता अनु धाडसी निर्णय घेणार आहे.अनुला स्वत:चा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेला प्रेक्षकांची उत्तम पसंती मिळते आहे. अनु आणि सिध्दार्थची हळूहळू फुलणारी मैत्री, सिध्दार्थ आणि दुर्गा आई मुलाचं नात. दुसरीकडे हरी आणि अनुची मैत्री हळूहळू घट्ट होऊ लागली आहे. अनु अजूनही सिध्दार्थला हरीच समजत आहे. तिला अजूनही माहिती नाही सिध्दार्थ हरी नसून खूप मोठ्या कंपनीचा मालक आहे. मालिकेमध्ये आता अनु धाडसी निर्णय घेणार आहे. अनु सध्या काम करत असलेल्या कंपनीमधील बॉसच्या विचित्र वागण्यामुळे, ती त्याला चांगलीच अद्दल घडवते आणि जॉब सोडून देते. कारण तो अनुबरोबर अनावश्यक जवळीक करण्याचा प्रयत्न करतो आणि अनुला ते सहन होत नाही आणि ती संपूर्ण स्टाफ समोर बॉसच्या कानाखाली मारते आणि अनु तो जॉब सोडून देते. कारण परिस्थिती कितीही हालाखीची असली तरीदेखील अनुला स्वत:चा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे. अनुच्या घरची परिस्थिती बरी नसून ती खूप कष्ट करून सासर आणि माहेर या दोघांचा सांभाळ करत आहे. तिच घरच्यांवर असलेले प्रेम आणि आदर हेच कुठेतरी सिध्दार्थला खूप आवडते आहे. अनु तिच्या घरच्या परिस्थतीला घेऊन खूप अस्वस्थ आहे. बऱ्याच इच्छा, स्वप्न आणि अपेक्षांना तिला पूर्ण करायचा आहे. याचसाठी तिला चांगल्या कामाची नितांत आवश्यकता आहे आणि ही गरज ओळखून हरी म्हणजेच सिध्दार्थ तिच्या मदतीला धावून येतो तिला मदत करण्याचा निर्णय घेतो... सिध्दार्थ दुर्गाशी बोलून त्यांच्याच कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी अनुला बोलावतो. अप्रत्यक्षरीत्या सिध्दार्थच मदत करत आहे या सत्यापासून अनु अनभिज्ञ आहे. अनु पोहचल्यानंतर असे काय घडते कि, दुर्गा अनुला बाहेरचा रस्ता दाखविते ? आता पुढे काय होणार ? अनु माहेर आणि सासरला कसे सांभाळणार ? अजून कुठले संकट अनुवर येणार आहे ? त्याला ती कशी सामोरी जाणार ? सिद्धार्थ तिची कशी मदत करणार हे बघणे रंजक असणार आहे... 

टॅग्स :मृणाल दुसानीस