Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिलीज होताच १८ देशांमध्ये 'या' सिनेमावर आली बंदी; तरीही झाला सुपरहिट, वादग्रस्त बोल्ड सीन्सची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:03 IST

जगात गाजलेला हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. परंतु सिनेमावर १८ देशांमध्ये बंदी आणण्यात आली

एक असा सिनेमा जो रिलीज तर झाला. पण रिलीज झाल्या झाल्याच सिनेमावर एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १८ देशांवर बंदी आणली गेली. या १८ देशांमध्ये भारताचाही समावेश होता. पुढे हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. मोजक्याच थिएटरमध्ये रिलीज झालेला हा सिनेमा ओटीटीवर आल्यावर चांगलाच गाजला. सिनेमाचं खूप कौतुक झालं. सिनेमातील बोल्ड सीन्सचीही चांगलीच चर्चा झाली. हा सिनेमा कोणता? जाणून घ्या.

१६ वर्षांपूर्वी रिलीज झाला हा सिनेमा

२००९ साली रिलीज झालेल्या 'एंटीक्राइस्ट' (antichrist movie) नावाचा सिनेमा रिलीज झाला होता. लार्स वॉर्न ट्रायर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. सिनेमात विलेम डेफो आणि चार्लोट गेन्सबर्ग हे कलाकार पाहायला मिळाले. या सिनेमाची कहाणी अशी आहे की, छोट्या मुलाच्या निधनाच्या दुःखातून सावरण्यासाठी नवरा-बायको जंगलात पिकनीकला जातं. परंतु परिस्थिती प्रचंड बिघडते. हायपरसेक्शुअल, डीप्रेशन सारख्या आजारांचा सामना करणारी बायको अचानक असं काही करते ज्यामुळे तिच्या नवऱ्याला नुकसान होतं.

चार चाप्टर्समध्ये या सिनेमाच्या कहाणीची विभागणी केली आहे. हळूहळू जंगलात भटकंती करायला आलेल्या जोडप्याचं आयुष्य कसं बदलतं हे पाहायला मिळतं. सिनेमा रिलीज झाल्यावर १८ देशांमध्ये या सिनेमांवर बंदी आणण्यात आली. वादग्रस्त बोल्ड सीन आणि काही असे प्रसंग होते जे पाहून प्रेक्षक सुन्न झाले. याशिवाय मानसिक आजार पुढे किती भीषण रुप धारण करतो, हेही या सिनेमात पाहायला मिळालं. सिनेमावर १८ देशांमध्ये बंदी आणली गेली तरीही ज्यांनी हा सिनेमा पाहिला त्यांना आवडला. IMDB वर सिनेमाला ६.६ इतकी रेटिंग आहे. हा सिनेमा इंग्रजी भाषेत प्राइम व्हिडीओ या ओटीटीवर उपलब्ध आहे.

टॅग्स :हॉलिवूडबॉलिवूड