Join us  

मस्करी आली अंगाशी... अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी पल्लवीला द्याव लागलं अखेर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 6:01 PM

अंशुमन विचारेची पत्नीचा एक नवीन व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

अभिनेता अंशुमन विचारे याची पत्नी पल्लवी विचारे हिने एक एप्रिलला अन्वीला भाऊ झाला असं म्हणत आनंदची बातमी  शेअर केली होती. अंशुमनतच्या इन्स्टावर ही पोस्ट शेअर करताना तिने एक लिंकसुद्धा दिली होती. यात अन्वीच्या मांडीवर एक लहान बाळ दिसतं होतं. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अंशुमनवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला तो अजूनही सुरुच आहे. आता अंशुमन विचारेच्या पत्नीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.  

 पल्लवीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिनं हा सगळा एप्रिल फूलचा प्लॅन होता आणि त्यांना अन्वी एकच मुलगी असून त्यांनी केलेला हा एप्रिल फुलचा प्लॅन त्यांना खूपच महागात पडला असल्याचं पल्लवीने सांगितले आहे.

पल्लवीने हा व्हिडीओ शेअर करत अंशुमनला या व्हिडीओमुळे येणाऱ्या कॉल आणि मॅसेजचा खूप होत असल्याचं सांगितयं. या सगळ्याचा त्याला खूप त्रास होतोय. त्यामुळे हे सगळं थांबवण्याची विनंती तिने सगळ्यांना केली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

अंशुमन हा अभिनेता म्हणून खूपच प्रसिद्ध असून त्याची लेक अन्वी ही देखील सोशल मीडिया चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तिचा क्युट अंदाज चाहत्यांना खूपच आवडतो. तिच्या गोड व्हीडिओंना तासाभरात लाखो व्हूज येतात.  

टॅग्स :अंशुमन विचारेटिव्ही कलाकार