Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका लग्नाची दुसरी गोष्ट! अंकिता लोखंडेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, खुल्लमखुल्ला पतीसोबत केलं लिपलॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 16:15 IST

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या चर्चेत आली आहे. तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अंकिताने दुसऱ्यांदा नवरा विकी जैनसोबत लग्न केले आहे. 

पवित्र रिश्ता मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आपल्या स्टाईलने सर्वांना वेड लावते. अभिनेत्री स्वतःशी संबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. नुकतेच अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैनसोबत गुलाबी रंगाच्या शिमरी साडीत रोमँटिक फोटोशूट केले आहे.

अंकिता लोखंडेने टीव्हीपासून चित्रपटांपर्यंत तिच्या दमदार अभिनयाने करोडो चाहते बनवले आहेत. लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने साडीसोबत एक सुंदर हेवी डायमंड नेकलेस घातला आहे. फिकट गुलाबी रंगाच्या साडीमध्ये अंकिता खूप सुंदर दिसत आहे. दुसरीकडे, विकी जैन देखील फॉर्मल कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.अंकिता आणि पती विकी जैनच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

अंकिता लोखंडेने व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिले की, "आम्ही पुन्हा लग्न केले". हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूप कमेंट करत आहेत. हे फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी एका ताऱ्याकडे इच्छा व्यक्त केली होती. मी वळले आणि तिथे तू होतास... आय लव्ह यू मिस्टर जे. अंकिता लोखंडेने २०२१ साली विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. विकी जैन पेशाने बिझनेसमन आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडे