Join us
Daily Top 2Weekly Top 5

भर मंडपात प्राजक्ता गायकवाडच्या नवऱ्याला अंकिता वालावलकरचा सल्ला, म्हणाली- "फक्त थोडंसं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:04 IST

अंकिताने लग्नाला हजेरी लावत प्राजक्ता आणि शंभुराज यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय तिने भर मंडपात प्राजक्ताचा नवरा शंभुराज यांना मोलाचा सल्लाही दिला.

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. प्राजक्ताने २ डिसेंबरला शंभुराज खुटवड यांच्यासह सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात प्राजक्ता आणि शंभुराज यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला कलाविश्वातील सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळींनीही हजेरी लावली होती. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिनेदेखील प्राजक्ताच्या लग्नाला उपस्थिती दर्शवली. 

अंकिताने लग्नाला हजेरी लावत प्राजक्ता आणि शंभुराज यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय तिने भर मंडपात प्राजक्ताचा नवरा शंभुराज यांना मोलाचा सल्लाही दिला. अंकिता म्हणाली, "मी जावईबापूंना टिप्स देऊ इच्छिते. तशा आम्ही मुली खूप छान आहोत, हे तुम्हालाही माहितच की प्राजक्ता किती गोड आहे. जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त आमचं थोडंसं ऐका. आम्ही नेहमीच बरोबर असतो. ती नेहमीच बरोबर असते".  

प्राजक्ता आणि शंभुराज यांचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता. त्यानंतर दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू होती. प्राजक्ताच्या लग्नासाठी चाहतेही आतुर होते. आता शंभुराज यांच्याशी लग्नगाठ बांधत आणि खुटवड घराण्याची सून होत प्राजक्ताने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिला चाहते आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ankita Valavalakar's advice to Prajakta Gaikwad's husband at the wedding.

Web Summary : Actress Prajakta Gaikwad recently married Shambhuraj Khutwad. Ankita Valavalakar attended the wedding and advised Shambhuraj to simply listen to Prajakta, emphasizing that girls are always right.
टॅग्स :प्राजक्ता गायकवाडअंकिता प्रभू वालावलकरसेलिब्रेटी वेडिंग