Join us

अंकिता लोखंडेच्या हातावर सजली विकीच्या नावाची मेहंदी; पाहा, व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 11:15 IST

Ankita Lokhande-Vicky Jain wedding : कतरिना कैफ व विकी कौशल नुकतेच लग्नबंधनात अडकले. आता पुढचा नंबर आहे तो अभिनेत्री अंकिता लोखंडेचा.

Ankita Lokhande-Vicky Jain wedding:  मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचा धडाका सुरू आहे. कतरिना कैफ व विकी कौशल नुकतेच लग्नबंधनात अडकले. आता नंबर आहे तो अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिचा. होय, अंकिता लवकरच बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत (Vicky Jain ) लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. काल अंकिताची मेहंदी सेरेमनी झाली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अंकिताच्या हातांवर विकीच्या नावाची मेहंदी सजली आहे. यावेळी अंकिताच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता. अंकिताच्या हातावर मेहंदी काढणारी आर्टिस्ट दुसरी कुणी नसून वीणा नागदा होती. होय, याच वीणाने कतरिनाच्या हातावरही मेहंदी काढली होती.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने अंकिताच्या मेहंदी सेरेमनीचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. यात अंकिता मेहंदी आर्टिस्ट वीणा नागदासोबत पोझ देताना दिसतेय.अंकिता व विकी येत्या 14 डिसेंबरला लग्नबंधणार अडकणार आहेत. आज 12 डिसेंबरला दोघांचा साखरपुडा होणार आहे.  13 तारखेला हळद आणि संगीत सेरेमनी आयोजित केली आहे. या लग्नात अंकिता व विकीचे काही जवळचे मित्र व कुटुंबीय सहभागी होणार आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचे विधी गेल्या आठवड्यात सुरू झाले आहेत. 

प्री-वेडिंग शूट

अंकिता व विकीच्या लग्नाआधी त्यांचा प्री-वेडिंग शूटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये अंकिता व विकी दोघांनी पांढºया रंगाचे कपडे घातले आहेत. यामध्ये अंकिता आणि विकी जैन वाळवंटात रोमॅन्टिक झालेले दिसत आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस, अंकितानं बॅचलर पार्टी एन्जॉय केली होती. ज्यामध्ये सृष्टी रोडे, अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर, रश्मी देसाई यांच्यासह अंकिताच्या अनेक मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :अंकिता लोखंडे