पवित्र रिश्ता या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे. साहजिकच दोघांच्या लग्नाची चर्चाही जोरात आहे. पण तूर्तास तरी हे लग्न होण्याची शक्यता नाही. होय, कारण अंकिताची अटच तशी आहे. लग्न करेन तर एका अटीवर, असे अंकिताने स्पष्ट केले आहे.
स्पॉटबॉयला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत अंकिताला तिच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दल विचारले असता तिने या अटीचा खुलासा केला. ‘लग्न तर करणार पण सध्या खूप काम करायचेय. लग्नाआधी मला खूप काही मिळवायचे आहे. लग्नाआधी मला एक सिनेमा करायचा आहे. जो फक्त माझा आणि माझाच सिनेमा असेन. मी त्या सिनेमाची लीड हिरोईन असेन. या सिनेमासाठी लोकांनी मला अनेकवर्षे आठवणीत ठेवावे, अशी माझी इच्छा आहे. मी टॅलेंटेड आहे, तेवढीच जिद्दीही. माझे हे स्वप्न नक्की पूर्ण होईल, असा मला विश्वास आहे. त्यानंतर मी लग्नाबद्दल विचार करेल,’ असे अंकिता या मुलाखतीत म्हणाली.
अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे.