Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसह शेअर केला फोटो, सध्या क्वॉलिटी टाईम करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 13:32 IST

विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.

गेल्या काही दिसांपासून सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरू आहे. यात वेळोवेळे अंकितादेखील सुशांतला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. सुशांतच्या निधनानंतर अंकिता दुःखात होती. अंकिताचे सुशांतवर जीवापाड प्रेम होते. मात्र काही कारणामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली आणि दोघेही वेगळे झाले. सध्या अंकिता सुशांत आत्महत्या करू शकत नाही, तो कोणत्याही प्रकारच्या नैराश्यात नव्हात. अगदी मनमोकळा आनंदात राहणारा असा सुशांत असल्याचे तिने सांगितले. सुशांतच्या आठवणीत अंकिताला स्वतःला सावरणे कठिणच जात होते. अशा परिस्थितीत अंकिताला तिचा बॉयफ्रेंड विकी जैननेच आधार दिला. हळहळू आता अंकिता यातून सावरत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अंकिता पहिल्यांदा इतके आनंदित दिसली. गौरी-गणपतीच्या पुजन करताना अंकिताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आता अंकिता कामा व्यतिरिक्त विकी जैनसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना पाहायला मिळतेय. तिने विकी जैनसोबत फोटो शेअर केले आहेत. यात दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळते. मध्यंतरी अंकिताच्या कुटुंबात दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाले असल्याचे तिने सांगितले होते.अंकिताचा बॉयफ्रेन्ड विकी जैन याची बहीण वर्षा जैन हिने दोन जुळ्यांना जन्म दिला.

 

अंकिताने या दोन्ही जुळ्यांचे नाव जाहीर करत, एक फोटो शेअर केला होता. होणा-या नणंदेच्या दोन्ही मुलांना कुशीत घेत पोज दिली होती. या फोटोत अंकिता प्रचंड आनंदी दिसली. फोटो शेअर करताना तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली होती. ‘आमचे कुटुंब आनंद साजरा करतेय. एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. जुळ्यांच्या जन्माने आमचे कुटुंब आणखी मोठे झालेय, वेलकम अबीर व अबीरा...

अंकिताचा विकी जैनसोबत साखरपुडा झाल्याचेही मानले जात आहे. गेल्यावर्षी अंकिता आणि विकीने मुंबईत 8 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. लग्नानंतर दोघेही याच फ्लॅटमध्ये राहणार असल्याचे कळते. विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.

अंकिता लोखंडेने छोट्या पडद्यावरून कारकीर्दीला सुरूवात केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिला पहिला ब्रेक मिळाला होता. या मालिकेतून ती खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर गेल्या वर्षी तिने कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ’

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत