Join us

सुशांत भरत होता ४.५ कोटी रूपयांच्या फ्लॅटचा EMI? अंकिता लोखंडेने फोटो शेअर करत केला खुलासा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 11:00 IST

आता अंकिता लोखंडेची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सुरू आहे. ईडीच्या तपासात सुशांतने त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला मालाडमध्ये साडेचार कोटींचा फ्लॅट खरेदी करून दिल्याची माहिती समोर आली आहे. याचे ईएमआयही सुशांतच भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहते. ही बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते आहे. यावर आता अंकिता लोखंडेची प्रतिक्रिया समोर आली आहे. अंकिताने सोशल मीडियावर आपले बँक अकाऊंटमधून प्रत्येक महिन्याला कट होणाऱ्या फ्लॅट पेपरचे फोटो शेअर केले आहेत.

अंकिताने फोटो शेअर करताना लिहिले, मी सर्व तर्क विर्तकांना विराम देते. हे माझ्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन आहे, 1 जानेवारी 2019 ते 1 मार्च 2020 या कालावधीतील माझ्या बँक अकाऊंट्सची पूर्ण डिटेल्स. माझ्या बँकेच्या अकाऊंटमधून प्रत्येक महिन्याला फ्लॅटचा EMI कट होतो. ज्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकतं नाही. 

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला शुक्रवारी 2 महिने पूर्ण झाले. सुशांतच्या आठवणीत भावूक झालेल्या अंकिता लोखंडे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने लिहिले, ''तुला जाऊन आज 2 महिने झाले सुशांत आणि मला माहिती आहे तू आता जिथे असशील तिथे आनंदी असशील .'' 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडे