Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडने शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणच्या या गाण्यावर केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 11:55 IST

अंकिता लोखंडेने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणच्या गाण्यावर थिरकताना दिसते आहे.

पवित्र रिश्ता मालिकेतून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेने बॉलिवूडपर्यंत प्रवास निश्चित केला आहे. तिने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले सिनेइंडस्ट्रीत स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसापासून ती तिच्या डान्स कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसते आहे. ती सातत्याने व्हिडीओ शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडीओवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो. नुकताच अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणच्या गाण्यावर थिरकताना दिसते आहे.

अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती व्हाइट रंगाच्या आउटफिटमध्ये दिसते आहे. यादरम्यान ती शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणचा चित्रपट चेन्नई एक्स्प्रेसमधील सुपरहिट गाणे तितली वर डान्स करताना दिसते आहे. तिचा या गाण्यावरील डान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. इतकेच नाही तर तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अंकिता लोखंडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती बागी ३मध्ये झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत रितेश देशमुख, टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. 
टॅग्स :अंकिता लोखंडेबागी ३