Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंगची एक्स अंकिताने खरेदी केला 8 BHKचा फ्लॅट, विक्की जैनसोबत अडकणार लग्नबेडीत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 13:18 IST

अंकिता लोखंडे गेल्या काही दिवसांपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन चर्चेत होती. सध्या ती तिच्या लग्नाच्या चर्चेला घेऊन चर्चेत आहे.

ठळक मुद्देलवकरच अंकिता आणि विक्की लग्नाच्या बंधनात अडकणार आहेतअद्याप दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिलेली नाही

अंकिता लोखंडे गेल्या काही दिवसांपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन चर्चेत होती. सध्या ती तिच्या लग्नाच्या चर्चेला घेऊन चर्चेत आहे. सुशांत सिंग राजपूतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता विक्की जैनला डेट करते आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांचा किस करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता अशी माहिती मिळतेय दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. 

या वर्षाच्या अखेरिस किंवा जानेवारी 2020मध्ये अंकिता आणि विक्की लग्न करु शकतात. दोघे एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत आहेत. दोघांचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीला देखील लागले आहेत. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार बी-टाऊनमध्ये दोघांनी 8 बीएचकेचा फ्लॅटदेखील खरेदी केला आहे. लग्नानंतर हे रोमाँटिक कपल नव्या घरात शिफ्ट होण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहेत. दोघांचे कुटुंबीय त्यांच्या या निर्णयाला घेऊन खूप खूश आहेत.  

विक्की आणि अंकिताची ओळख एक कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली. विक्की बिझनेसमन आहे. रिपोर्टनुसार दोघे एकाच सोसायटी राहतात. अद्याप दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिलेली नाही. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर अंकिताने कंगना राणौतच्या मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यात तिने झलकारी बाईची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले.

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत