Join us

मिलिंद सोमण-अंकिताच्या प्रेमाला बहर...!  शेअर केला रोमॅन्टिक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 17:33 IST

सुपरमॉडेल मिलिंद सोमण सध्या पत्नी अंकितासोबत सुट्ट्यांचा आनंद घेतोय.

ठळक मुद्दे2006 साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. या दोघांचे ब्रेकअफ झाले त्यानंतर मिलिंद अंकिताच्या प्रेमात पडला. अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे.

मिलिंद सोमण आणि अंकिता  एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले कपल आहे, यात शंका नाही. सध्या हे कपल अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. यादरम्यानचे अनेक रोमॅन्टिक फोटो व व्हिडीओ दोघांनी शेअर केले आहेत.तूर्तास अंकिता व मिलिंदचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अंकिताने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘कॅमे-यात कोणताही क्षण कैद करणे, बाटलीत अत्तर भरण्यासारखे आहे. अत्तराची बाटली कधीही उघडू शकते आणि तो क्षण पुन्हा जिवंत होऊ शकतो...’, असे सुंदर कॅप्शन तिने हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे.

याआधी दोघांनी समुद्रकिना-यावरचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले होते. मिलिंदने समुद्रकिना-यावरचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले होते. ‘फक्त मी आणि अंकिता...दूरदूरपर्यंत कोणी नाही...’, असे हा फोटो शेअर करताना मिलिंदने लिहिले होते.

मिलिंद व अंकिता विशेष म्हणजे दोघांमध्ये 25 वर्षांचा फरक  आहे. 54 वर्षीय मिलिंदने 22 एप्रिल 2018 रोजी आपल्या अर्ध्या वयाच्या अंकितासोबत अलीबागमध्ये लग्न केले होते. त्यांचा विवाहसोहळा अतिशय खासगी होता, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि निवडक मित्र या लग्नाला उपस्थित होते. 

2006 साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. या दोघांचे ब्रेकअफ झाले त्यानंतर मिलिंद अंकिताच्या प्रेमात पडला. अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे.   अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता व आर्यन मॅन मिलिंद सोमण आपल्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत येत असतो. याशिवाय तो त्याची पत्नी अंकीता कुंवरसोबतच्या फोटोंमुळेही ब?्याचदा चर्चेत येत असतो. वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही मिलिंद सोमण आजही तितकाच तरूण दिसतो.  

कायम एकच टी-शर्ट आणि एकच चप्पल? ट्रोल झाला मिलिंद सोमण, अंकिताने असे दिले उत्तर

ये खुली वादियाँ... ये खुला आसमाँ.....मिलिंद अंकिताचे हे फोटो देतायेत कपल गोल, SEE PIC

टॅग्स :मिलिंद सोमण