Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राणी प्रेमी मि. अँड मिसेस खरेरा! मानसी नाईक नवऱ्यासोबत पोहोचली जंगलात !, पहा त्यांंचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 16:37 IST

मानसी नाईकने प्रदीप खरेरासोबत लग्न केल्यापासून ही जोडी चर्चेत येत असते.

अभिनेत्री मानसी नाईक बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. ती नेहमीच काही ना काही नवीन आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येत असते. दररोजच्या आयुष्यातील आनंदी क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यात लग्न झाल्यानंतर मिसेस खरेरा बऱ्याचदा पतीसोबतचे रोमॅन्टिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

मानसी नाईकने प्रदीप खरेरासोबत लग्न केल्यापासून ही जोडी चर्चेत येत असते. प्रदीप देखील आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत काही ना काही नवीन शेअर करताना दिसतो. नुकताच प्रदीपने प्राण्यांसोबत खेळतानाचा आणि त्यांना फळ खायला घालताना एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या लॉकडाउनमुळे जंगलात असणाऱ्या प्राण्यांना खायला पुरेशा गोष्टी मिळत नाही. त्यामुळे प्राणी प्रेमी ही मानसी आणि प्रदीपची जोडी थेट जंगलात पोहोचली आणि त्यांनी प्राण्यांच्या खाण्याच्या सोय केली. प्रदीपने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतुक केले आहे. प्राण्यांना मदत करण्याची विनंती यावेळी प्रदीपने केली आहे.

मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो अभिनेता आणि मॉडेलही आहे. तर मानसी नाईक ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत.

याशिवाय एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने काम केले आहे.

टॅग्स :मानसी नाईक