Join us
Daily Top 2Weekly Top 5

या बॉलिवूड अभिनेत्रीला आदर्श मानते 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरी! म्हणाली, "बाहेरच्या देशात जाऊन तिथे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 17:43 IST

'अ‍ॅनिमल' मधील तृप्ती कोणत्या अभिनेत्रीला आदर्श मानते, याचा खुलासा तिने केलाय. काय म्हणाली तृप्ती? बघा

'अ‍ॅनिमल' मधील भाभी 2 अर्थात अभिनेत्री तृप्ती डिमरी ही सर्वांची लाडकी अभिनेत्री झाली आहे. 'अ‍ॅनिमल' सिनेमामुळे तृप्तीच्या फॅन फॉलोईंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. 'अ‍ॅनिमल'नंतर तृप्ती सध्या कार्तिक आर्यनसोबत भूलभूलैय्या 3 च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सर्वांची आवडती अभिनेत्री तृप्ती बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्रीला तिची आदर्श मानते. कोण आहे ती अभिनेत्री?

तृप्ती डिमरी बॉलीवूडमध्ये प्रियंका चोप्राला तिची आदर्श मानते. तृप्ती म्हणते, 'बॉलिवुडमध्ये प्रियंका चोप्रा ही माझी आदर्श आहे. तिच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. 'बर्फी' हा माझा आवडता चित्रपट आहे. बर्फी पाहताना मी प्रियंका चोप्राला ओळखू शकले नाही. कोणत्याही कलाकारासाठी सर्वात मोठी गोष्ट ती असते, जेव्हा तो भूमिका इतक्या तीव्रतेने साकारतो की प्रेक्षक त्या व्यक्तिरेखेत हरवून जातात.'

तप्ती पुढे म्हणाली, इतकंच नाही तर प्रियंका चोप्राने भरपूर आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास मला खुप काही शिकवून जातो. आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाणे ही मोठी गोष्ट आहे. प्रियंका भारत सोडून दुसऱ्या देशात केवळ गेली नाही तर त्या देशात तिने आपल्या करिअरची नव्याने सुरुवात केली. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं. मला प्रियंका चोप्रा खूप धाडसी व्यक्ती वाटते." अशाप्रकारे तृप्तीने प्रियंकाचं कौतुक करुन तिच्याप्रती आदर दर्शवला

टॅग्स :तृप्ती डिमरीप्रियंका चोप्राकार्तिक आर्यन