Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नादिवशीच पत्नी सुनिताला पाहून अनिल कपूरच्या डोळ्यात तरळले होते अश्रू, कारण...

By गीतांजली | Updated: December 24, 2020 19:40 IST

बर्‍याच लोकांनी भविष्यवाणी केले होती की लवकर लग्न केल्यामुळे याचा परिणाम माझ्या करिअरवर होईल.

अनिल कपूर आज ( 24 डिसेंबरला) आपला 64 वा वाढदिवस सेलिब्रेट करतोय. अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अनिल कपूरची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्याने 19 मे 1984 रोजी  सुनिताशी लग्न केले. यावर्षी त्यांच्या लग्नाच्या 36 व्या वाढदिवस सेलिब्रेट केला. त्यानिमित्ताने अनिल कपूरने सोशल मीडियावर आपली क्यूट लव्हस्टोरी शेअर केली. अभिनेत्याने आपल्या लग्नाचे काही न पाहिलेले फोटो शेअर करत आणि आपल्या लग्नाशी संबंधित काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या होत्या. लांबणीवर पडले होते लग्नअनिल कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत लिहिले की, '19 मे हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगला दिवस आहे. मी सुनिताला प्रपोज केले होते. आमचे लग्न खूप लांबणीवर पडले कारण मला वाटते होते की मी तिची काळजी घेण्यासाठी सक्षम व्हायला हवं. किमान एक घर विकत घ्यावे आणि जेवण्यासाठी एक कुक ठेवू शकू'.

 पुढे त्याने लिहिले की, 'अनेक अडचणीनंतर आमचे 19 मे रोजी लग्न झाले. मला आठवतेय जेव्हा मी तिच्या घरी गेलो होतो आणि तिला वधूच्या वेशात हसताना पाहिले त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. आमचं लग्न एका दिवसाच्या तयारीत झाले होते. आमचे लग्न भव्य नव्हते किंवा आम्ही हनिमूनला ही गेलो नाही, यासाठी ती अजूनही मला छेडते, पण माझ्या आयुष्यातील ही सर्वात चांगली गोष्ट होती.'

अनिल कपूरने पुढे लिहिले, 'बर्‍याच लोकांनी भविष्यवाणी केले होती की लवकर लग्न केल्यामुळे याचा परिणाम माझ्या करिअरवर होईल. पण मला तिच्याशिवाय माझ्या आयुष्याचा एक दिवसही घालवायचा नव्हता. ती माझ्यासोबत असावी अशी माझी इच्छा होती. आमच्यासाठी कधीही करियर किंवा प्रेम  नव्हते, आमच्यासाठी प्रेम आणि करियर होते '.

सुनिता उचलायची खर्च स्ट्रगलिंगच्या दिवसांत अनिल कपूरकडे पैसे नव्हते, तेव्हा सुनिता त्याची काळजी घेत होती. जेव्हा दोघांची पहिली भेट झाली तेव्हा अनिल कपूर संघर्ष करणारा अभिनेता होता आणि सुनीता एक सुप्रसिद्ध मॉडेल होती.  

टॅग्स :अनिल कपूर